scorecardresearch

Australia Won World Cup 2023 Final : “दुर्दैवाने कालचा दिवस…”, ड्रेसिंग रुममध्ये मोदींनी खेळाडूंची भेट घेतल्यानंतर शमीची पोस्ट चर्चेत!

Cricket World Cup 2023, IND vs AUS Final : सामना मध्यावर पोहोचलेला असताना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दाखल झाले आणि अवघ्या भारतीयांच्या मनात आनंदाचं भरतं आलं. त्यांच्यावर कॅमेरे झळकले तेव्हा त्यांनी हात उंचावून समस्त क्रिकेटप्रेमींना अभिवादनही केलं. त्यांचे स्टेडिअममधील हे व्हिडीओही व्हायरल झाले.

PM Narendra Modi in dressing Room
ड्रेसिंग रुममध्ये पंतप्रधानांनी घेतली खेळाडूंची भेट (फोटो – रविंद्र जडेजा/X)

Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India : विश्वचषक २०२३ च्या प्रत्येक सामन्यात अव्वल ठरलेल्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात मात्र मुरब्बी ऑस्ट्रेलियासमोर हार पत्करावी लागली. या दोन संघांमध्ये २००३ विश्वचषक स्पर्धेतही अंतिम सामना झाला होता आणि तो ऑस्ट्रेलियाने सहज जिंकला होता. देशातील १४० कोटी जनतेचे डोळे काल झालेल्या अंतिम सामन्याकडे लागले होते. एवढंच नव्हे तर खुद्द देशचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबेदामधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये दाखल झाले. त्यांनी स्टेडिअमवरूनच ऐतिहासिक असा सामना याची देही याची डोळा पाहिला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीचीही काल जोरदार चर्चा होती. दरम्यान, भारताच्या हातून हा सामना निसटून गेल्यानंतर त्यांनी भारतीय खेळाडूंची ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भेट घेतली. भारताचा ऑल राऊंडर क्रिकेटर रविंद्र जडेज आणि मोहम्मद शमीने त्यांचा फोटो X वर पोस्ट केला आहे.

विश्वचषकाचा सामना अहमदाबादेत होणार असल्याचे निश्चित झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सामन्याला हजर राहणार असल्याची चर्चा होती. मात्र, यावर अधिकृत माहिती मिळत नव्हती. काल (१९ नोव्हेंबर) सामना सुरू होण्यापूर्वीही नरेंद्र मोदी स्टेडिअमवर येणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु, सामना मध्यावर पोहोचलेला असताना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दाखल झाले आणि अवघ्या भारतीयांच्या मनात आनंदाचं भरतं आलं. त्यांच्यावर कॅमेरे झळकले तेव्हा त्यांनी हात उंचावून समस्त क्रिकेटप्रेमींना अभिवादनही केलं. त्यांचे स्टेडिअममधील हे व्हिडीओही व्हायरल झाले.

World Cup 2023: In Hyderabad Pakistani cricketers ate biryani took selfies with fans watch the video
Pakistan Team: हैदराबादमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी मारला बिर्याणीवर ताव, चाहत्यांबरोबर घेतले सेल्फी, पाहा Video
who are the four players who will lift the trophy for Team India
IND vs AUS: मालिका विजयानंतर टीम इंडियाची ट्रॉफी उंचावणारे कोण होते ‘ते’ चौघे? चाहत्यांना पडला प्रश्न
Jasprit Bumrah Gives Indian Fans Heart Attack with Nasty Ankle Twist Teammates Give Worried Look Video went viral
IND vs SL: एका मिनिटासाठी भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला, जसप्रीत बुमराहबाबत असं काही घडलं की; पाहा Video
uk pm Rishi Sunaks Adorable Moment With Bangladesh PM Sheikh Hasina At G20
अनवाणी पायांनी गुडघ्यावर बसून बांगलादेशच्या पंतप्रधानांशी केला वार्तालाप; ब्रिटन पंतप्रधानांचा साधेपणा चर्चेत!

हेही वाचा >> Australia Won World Cup 2023 Final: अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं? BCCI नं शेअर केला VIDEO!

अटीतटीच्या ठरलेल्या सामन्यात शेवटच्या क्षणी काहीतरी चमत्कार होण्याची आशा होती. परंतु, आजवर दिग्विजयी ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघांच्या तुलनेत विद्यमान संघ कमकुवत होता. तरीही अंतिम सामन्यात छोट्या-छोट्या बाबींवर लक्ष केंद्रित करून, प्रतिस्पर्ध्याला कोणतीही संधी न देता आणि अपेक्षांचे जराही दडपण नसल्यामुळे अधिक मोकळेपणाने खेळ करत ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघावर बाजू उलटवली. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय क्रिकेट रसिकांची घोर निराशा झालीच.

भारतीय संघाने सामना गमावला असला तरीही त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट खेळाडूंचं ड्रेसिंग रुम गाठलं. तिथं उपस्थित असलेल्या आणि नाराज-दुःखी झालेल्या खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक करून त्यांना हस्तांदोलन केलं. याबाबतची X पोस्ट रविंद्र जडेजाने केली आहे.

हेही वाचा >> Australia Won World Cup 2023 Final: वर्ल्ड कपची ट्रॉफी पायाखाली! मिशेल मार्शच्या ‘या’ कृतीवरून वादंगाची शक्यता

“आपल्याकडे चांगली स्पर्धा झाली, पण आम्ही काल कमी पडलो. आम्ही सर्व दुःखी आहोत. पण तरीही आम्हाला लोकांचा पाठिंबा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ड्रेसिंग रुमला भेट दिली. या भेटीत त्यांनी खेळाडूंना प्रेरणा दिली”, अशी पोस्ट रविंद्र जडेजाने केली आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी रविंद्र जडेजाशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत.

मोहम्मद शमीनेही याबाबत पोस्ट केली आहे. “दुर्दैवाने कालचा आमचा दिवस नव्हता. पण मला आणि आमच्या संघाला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार. ड्रेसिंग रुममध्ये येऊन त्यांनी आमचं मनोबल वाढवलं. आम्ही पुन्हा लढू!” अशी पोस्ट मोहम्मद शमीने केली आहे.

सामना कसा होता

विश्वचषक २०२३ या स्पर्धेत भारतीय गोलंदाजी सर्वोत्तम ठरली होती. मात्र, अंतिम सामन्यात एकाही गोलंदाजाला प्रभाव पाडता आला नाही. भारतीय फलंदाजी या स्पर्धेत विलक्षण बहरली होती. तरी अंतिम सामन्यात एकाही फलंदाजाला म्हणावी अशी छाप पाडताच आली नाही. रोहित शर्मा अर्धशतकासमीप पोहोचला, पण मोक्याच्या क्षणी बाद झाला. विक्रमवीर विराट कोहली अर्धशतक झळकावून लगेचच बाद झाला. तर के. एल. राहुलचे अर्धशतक कुर्मगतीमुळे संघासाठी कुचकामी ठरले. शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे इतर फलंदाज अपयशी ठरले. माफक २४० धावांचा बचाव करताना गोलंदाजांनाही सूर सापडला नाही. पहिल्या सत्रापेक्षा अधिक जिवंत झालेली खेळपट्टी, दव आणि स्पर्धेत याआधी दाखवलेल्या कल्पकतेचा अभाव या घटकांमुळे भारतीय गोलंदाजी कुचकामी ठरली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm narendra modi met indian cricketers in dressing room after after heartbreaking loss to australia in 2023 cwc final sgk

First published on: 20-11-2023 at 15:13 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×