नवी दिल्ली : गेल्या वर्षी टोक्यो येथे ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा पदक मिळवण्यात अपयश आल्यानंतर कुस्तीतून निवृत्ती स्वीकारण्याचा माझा विचार होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे मी निवृत्तीचा निर्णय बदलला, अशी आठवण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या विनेश फोगटने सांगितली.

२०१६ मध्ये झालेल्या रियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत विनेशला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. तर गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आपल्या वजनी गटाच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असतानाही विनेशला पदकापर्यंतची मजल मारता आली नाही. या निराशाजनक कामगिरीनंतर कुस्ती सोडण्याचा विचार आपल्या मनात आल्याचे विनेश म्हणाली.

ahmednagar lok sabha election 2024 marathi news
नगरमध्ये पवार-विखे पारंपारिक संघर्ष वेगळ्या वळणावर!
gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO

विनेश फोगट हिला उपांत्यपूर्वच्या सामन्यात गंभीर दुखापत

‘‘मानसिकदृष्टय़ा मला खूप ताण जाणवत होता. दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू न शकल्याने मी कुस्ती सोडण्याचा विचार करत होते. एका खेळाडूसाठी ऑलिम्पिक हे कारकीर्दीतील सर्वात मोठे व्यासपीठ असते. तिथे आलेले अपयश स्वीकारणे अवघड असते,’’ असे विनेशने सांगितले.

“होय, ऑलिम्पिकमध्ये ‘ती’ चूक झाली”, कुस्तीपटू विनेश फोगाटनं मान्य केला WFI चा आरोप!

‘‘निराश असताना माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली होती. त्यांनी मला पाठिंबा दर्शवला. पुन्हा चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आम्हाला तुझ्यावर विश्वास असून तू चमकदार कामगिरी करू शकतेस याची खात्री आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे मी आणखी जोमाने मेहनत घेतली,’’ असे विनेश म्हणाली.