भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी२० सामना २५ सप्टेंबर रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी येथे एक मोठी घटना घडली आहे. गुरुवारी जिमखाना मैदानावर तिकिटांसाठी क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, त्यात अनेक जण जखमी झाले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी२० सामना २५ सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर तीन वर्षांपासून आतुर असलेल्या प्रेक्षकांची गर्दी जमली होती. तसेच कोविड काळात मागे कुठल्याही प्रेक्षकाला स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहता आला नव्हता. त्यामुळे परिस्थिती अशी निर्माण झाली की, पोलिसांना चाहते सांभाळणे कठीण झाले. रात्री उशिरापासूनच चाहते तिकीट खरेदीसाठी स्टेडियमबाहेर पोहोचू लागले असल्याचे सांगण्यात येत आहे. जसजशी सकाळ होत गेली तसतशी गर्दी वाढत गेली, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या हल्ल्यात २० जण जखमी झाले असून सात जणांना यशोदा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. तिकीट खिडकीवर एवढा गोंधळ का होता, याचा तपास हैदराबाद पोलिसांनी सुरू केला आहे.

तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही

वास्तविक, हैदराबादमध्ये गेल्या तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. तिकीट खिडकी उघडताच बघ्यांची गर्दी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, काल जिमखान्याबाहेर तिकिटांसाठी शेकडो चाहत्यांनी गर्दी केली होती. हैदराबाद आणि सिकंदराबादचे चाहते भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत कारण त्यांनी गेल्या तीन वर्षांत अव्वल दर्जाचे क्रिकेट सामने पाहिले नाहीत.

पेटीएमने सांगितले की तिकिटे लवकरच उपलब्ध होतील

सकाळी सहा वाजल्यापासूनच जिमखान्यात चाहत्यांची रांग लागली आहे. गुरुवारी घटनास्थळी झालेल्या गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना चाहत्यांवर लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, पेटीएम वेबसाइटने संकेत दिले की तिकिटे लवकरच उपलब्ध होतील. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (एचसीए) अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेटीएम अॅप आणि पेटीएम इनसाइडर अॅपद्वारे तिकिटे विकली जातील. तिकिटाची किंमत १०,००० ते ३०० रुपयांपर्यंत आहे. सुमारे ५५,००० क्षमतेचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे शहरातील मुख्य क्रिकेट स्टेडियम आहे. हे अत्याधुनिक सुविधांसाठी प्रसिद्ध आहे आणि अनेक आंतरराष्ट्रीय खेळांचे आयोजन केले आहे.