पूजा धांडाला कांस्यपदक

भारताची अव्वल कुस्तीपटू पूजा धांडाने गुरुवारी जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.

(संग्रहित छायाचित्र)

जागतिक कुस्ती स्पर्धा

भारताची अव्वल कुस्तीपटू पूजा धांडाने गुरुवारी जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. महिलांच्या ५७ किलो वजनी गटात नॉर्वेच्या ग्रेस बुलेन हिला १०-७ असे नमवून पूजाने कांस्यपदकावर नाव कोरले. जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारी ती भारताची  तिसरी महिला कुस्तीपटू ठरली आहे.  याआधी अलका तोमरने २००६ मध्ये तर गीता फोगट हिने २०१२ मध्ये कांस्यपदक पटकावले होते.

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिक हिला ६२ किलो वजनी गटाच्या रिपिचेज फेरीत हंगेरीच्या मारियाना सास्तिन हिच्याकडून २-३ असे पराभूत व्हावे लागले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pooja dhand win bronze medal

ताज्या बातम्या