Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत शनिवारी भारतीय महिला खेळाडूंनी दमदार सुरूवात करून दिली. १७ वर्षीय कुमकुम मोहोडने तिरंदाजीत सुवर्णपदकाला गवसणी घातल्यानंतर गोल्फर प्रणवी शरथ उर्सने गोल्फमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहासाला गवसणी घातली आहे. प्रणवी शरथ उर्स ही आशियाई क्रीडा स्पर्धेतील गोल्फमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यासह आपल्या संघाला तिने रौप्यपदक जिंकून दिलं.

प्रणवीने जिंकलेलं हे पदक भारताचं आशियाई क्रीडा स्पर्धेतील ७८ वे पदक आहे. तर गोल्फमध्ये सांघिक प्रकारात जिंकलेलं पदक हे ७९ वे पदक आहे. भारताने आतापर्यंत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण १८ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. यादरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला हरवून जिंकलेल्या सुवर्णपदकाचा देखील समावेश आहे. आता क्रिकेटमध्ये आणखी एक सुवर्णपदक येण्याची शक्यता आहे. भारतीय संघाकडे पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदकावर नाव करण्याची सुवर्णसंधी आहे.

भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण १८ सुवर्ण, २६ रौप्य आणि ३५ कांस्यपदकं पटकावली आहेत. पदकांच्या गुणतालिकेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. भारत सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. या गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या उज्बेकिस्तानने २० सुवर्ण, दक्षिण कोरियाने ३३ सुवर्ण, जपानने ७२ आणि चीनने सर्वाधिक १६२ सुवर्णपदकांची कमाई केली आहे.

सर्वाधिक पदक पटकावण्याच्या बाबतीत चीन अव्वल स्थानी आहे. चीनने सर्वाधिक ३१७ पदकांची कमाई केली आहे. ज्यामध्ये १६२ सुवर्णपदक, ८१ रौप्य आणि ७४ कांस्यपदकांचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंनी शुक्रवारी एकाच दिवशी ६ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. यादरम्यान भारतीय महिला हॉकी संघाने चीनला पराभूत करून पहिल्यांदाच ऐतिहासिक पदक पटकावलं.