एपी, लंडन : चेल्सी आणि लिव्हरपूल या बलाढय़ संघांमधील प्रीमियर लीग फुटबॉलचा सामना २-२ असा बरोबरीत संपला. चेल्सीचे प्रशिक्षक थॉमस टूशेल यांनी आघाडीपटू रोमेलू लुकाकूला संघातून वगळले. मात्र, चेल्सीने लिव्हरपूलला उत्तम लढत दिली.

साडिओ माने (नववे मिनिट) आणि मोहम्मद सलाह (२६वे मि.) यांच्या गोलमुळे लिव्हरपूलला २-० अशी आघाडी मिळाली. त्यानंतर चेल्सीने खेळात सुधारणा करताना लिव्हरपूलच्या बचाव फळीवर सातत्याने दडपण टाकले. मध्यंतरापूर्वी माटेओ कोव्हाचिच (४२वे मि.) आणि ख्रिस्टियन पुलिसिच (४५वे मि.) यांनी गोल करत चेल्सीला २-२ अशी बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात दोन्ही संघांना गोल न करता आल्याने हा सामना बरोबरीतच सुटला.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

या निकालानंतर प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत चेल्सी (२१ सामन्यांत ४३ गुण) दुसऱ्या, तर लिव्हरपूल (२० सामन्यांत ४२ गुण) तिसऱ्या स्थानावर आहे.