scorecardresearch

प्रीमियर लीग फुटबॉल : आर्सेनल, टॉटनहॅमची बाजी 

आर्सेनल आणि टॉटनहॅम या संघांनी प्रीमियर लीग फुटबॉलमधील आपले सामने जिंकत पुढील हंगामातील चॅम्पियन्स लीगच्या पात्रतेसाठी दावेदारी भक्कम केली आहे.

लंडन : आर्सेनल आणि टॉटनहॅम या संघांनी प्रीमियर लीग फुटबॉलमधील आपले सामने जिंकत पुढील हंगामातील चॅम्पियन्स लीगच्या पात्रतेसाठी दावेदारी भक्कम केली आहे. आर्सेनलने रॉब होल्डिंग (३८वे मिनिट) आणि गॅब्रिएल (५४वे मि.) यांच्या गोलमुळे वेस्ट हॅमला २-१ असे पराभूत करत गुणतालिकेतील आपले चौथे स्थान कायम ठेवले. दुसरीकडे, टॉटनहॅमने आघाडीपटू सॉन ह्युंग-मिनचे (६० आणि ७९वे मि.) दोन गोल आणि हॅरी केनच्या (२२वे मि.) एका गोलच्या जोरावर लिस्टर सिटीला ३-१ अशा फरकाने नमवले. या निकालांनंतर चौथ्या स्थानावरील आर्सेनलचे ३४ सामन्यांत ६३ गुण झाले असून पाचव्या स्थानावरील टॉटनहॅमच्या खात्यावर ३४ सामन्यांत ६१ गुण आहेत. हंगामाअंती गुणतालिकेतील अव्वल चार संघ पुढील हंगामाच्या चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्यास पात्र ठरतील.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Premier league football arsenal tottenham winning matches strong team ysh

ताज्या बातम्या