लिव्हरपूल : मोहम्मद सलाहच्या दोन गोलमुळे लिव्हरपूलने मंगळवारी मँचेस्टर युनायटेडवर ४-० असा शानदार विजय मिळवत प्रीमियर लीग फुटबॉलच्या गुणतालिकेत पुन्हा अग्रस्थानी झेप घेतली.
लिव्हरपूलकडून सलाह (२२व्या, ८५व्या मिनिटाला), लुइझ डियाझ (५व्या मि.), सादिओ माने (६८व्या मि.) यांनी गोल केले. या विजयामुळे लिव्हरपूलचे ३२ सामन्यांत ७६ गुण झाले आहेत.
