scorecardresearch

प्रीमियर लीग फुटबॉल : मँचेस्टर सिटी संघाचा विजय

बॉर्नमाऊथकडून जेफरसन लेर्माने (८३व्या मि.) गोल करत आघाडी काहीशी कमी केली.

प्रीमियर लीग फुटबॉल : मँचेस्टर सिटी संघाचा विजय
अर्लिग हालँड

लंडन : पहिल्या सत्रात केलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर मँचेस्टर सिटी संघाने प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये बॉर्नमाऊथ संघावर ४-१ असा विजय मिळवला.

सामन्याच्या पहिल्या सत्रात सिटीच्या झंझावातासमोर बॉर्नमाऊथच्या बचावफळीचा निभाव लागला नाही. ज्युलिअन अल्वारेझ (१५व्या मिनिटाला), अर्लिग हालँड (२९व्या मि.) व फिल फोडेन (४५व्या मि.) यांनी गोल सिटीला मध्यंतरापर्यंत ३-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात, ख्रिस मेफामने (५१व्या मि.) केलेल्या स्वयंगोलमुळे सिटीच्या आघाडीत आणखी भर पडली. बॉर्नमाऊथकडून जेफरसन लेर्माने (८३व्या मि.) गोल करत आघाडी काहीशी कमी केली. यानंतर सिटीच्या बचावफळीने त्यांना एकही गोल करण्याची संधी न देता आघाडी अखेपर्यंत कायम राखत विजय नोंदवला. हालँडचा सध्याच्या प्रीमियर लीग हंगामातील हा २७वा गोल आहे.

अन्य सामन्यात, गॅब्रिएल मार्टिनेलीच्या (४६व्या मिनिटाला) निर्णायक गोलच्या जोरावर आर्सेनलने लिस्टर सिटीवर १-० अशा विजयाची नोंद केली. तर, लिव्हरपूल व क्रिस्टल पॅलेस यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 02:11 IST
ताज्या बातम्या