scorecardresearch

प्रीमियर लीग फुटबॉल : मँचेस्टर सिटीची चेल्सीवर मात

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सिटीने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना चेल्सीच्या बचाव फळीवर दडपण टाकले.

Football
(संग्रहित छायाचित्र)

मध्यरक्षक केव्हिन डी ब्रूनच्या गोलमुळे मँचेस्टर सिटीने प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात चेल्सीवर १-० अशी मात केली. सिटीचा हा सलग १२वा विजय ठरला.

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सिटीने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना चेल्सीच्या बचाव फळीवर दडपण टाकले. पूर्वार्धात सिटीच्या जॅक ग्रिलिशला गोल करण्याची संधी मिळाली, पण त्याचा फटका चेल्सीचा गोलरक्षक केपाने अडवल्याने मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात सिटीला गोलच्या अधिक संधी मिळण्यास सुरुवात झाली. अखेर ७०व्या मिनिटाला जाओ कॅन्सेलोच्या पासवर डी ब्रूनने अप्रतिम फटक्यासह चेंडू गोलजाळ्यात मारल्याने सिटीला १-० अशी आघाडी मिळाली. मग त्यांनी भक्कम बचाव करत चेल्सीला पुनरागमनाची संधी दिली नाही.        या विजयासह सिटीने प्रीमियर लीगच्या गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Premier league football manchester city beat chelsea akp

ताज्या बातम्या