मँचेस्टर : रियाद मेहारेझला निर्णायक क्षणी गोल करण्यात अपयश आल्याने मँचेस्टर सिटीला प्रीमियर लीग फुटबॉलमधील वेस्ट हॅमविरुद्धच्या सामन्यात २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात वेस्ट हॅमचे दोन्ही गोल जॅरेड बोवेनने (२४वे आणि ४५वे मिनिट) झळकावले, तर सिटीकडून जॅक ग्रिलिश (४९वे मि.) आणि व्लादिमिर कुफाल (६९वे मि., स्वयंगोल) यांनी गोल केले. तसेच ८६व्या मिनिटाला सिटीला पेनल्टी मिळाली. मात्र यावर महारेझने मारलेला फटका प्रतिस्पर्धी संघाचा गोलरक्षक ल्युकास फॅबियान्स्कीने रोखला. त्यामुळे सामना बरोबरीत राहिला आणि दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला. या बरोबरीमुळे लिव्हरपूलने जेतेपदाच्या शर्यतीतील आपले आव्हान कायम ठेवले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premier league football manchester city west ham draw round manchester city ysh
First published on: 17-05-2022 at 00:02 IST