scorecardresearch

प्रीमियर लीग फुटबॉल : रोनाल्डोमुळे युनायटेडचा विजय

रोनाल्डोने सातव्या आणि ३२व्या मिनिटाला गोल करत युनायटेडला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

मँचेस्टर : तारांकित आघाडीपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात नॉर्विच सिटीवर ३-२ असा विजय मिळवला.

युनायटेडचे घरचे मैदान ओल्ड ट्रॅफोर्डवर झालेल्या या सामन्याच्या सुरुवातीला यजमानांनी आक्रमक खेळ केला. रोनाल्डोने सातव्या आणि ३२व्या मिनिटाला गोल करत युनायटेडला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, मध्यंतरापूर्वी किरेन डॉवेलने केलेल्या गोलमुळे नॉर्विचला पुनरागमनाची संधी निर्माण झाली. उत्तरार्धात सुरुवातीला नॉर्विचने युनायटेडच्या बचाव फळीवर दडपण टाकले. ५२व्या मिनिटाला आघाडीपटू टीमू पुक्कीने गोल करत नॉर्विचला २-२ अशी बरोबरी करून दिली. मात्र, ७६व्या मिनिटाला युनायटेडला फ्री-किक मिळाली. रोनाल्डोने यावर गोल करत युनायटेडचा विजय साकारला.

अन्य लढतींत, साउदम्टनने आर्सनलला, ब्रायटनने टॉटनहॅमला १-० असा पराभवाचा धक्का दिला. ६० रोनाल्डोच्या व्यावसायिक कारकीर्दीतील ही ६०वी हॅट्ट्रिक ठरली. कारकीर्दीत सर्वाधिक हॅट्ट्रिक करणाऱ्या सक्रिय फुटबॉलपटूंमध्ये त्याचा अव्वल क्रमांक लागतो.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Premier league manchester united won due to cristiano ronaldo hat trick zws

ताज्या बातम्या