बर्मिंगहॅम २०२२ कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने रौप्य पदक जिंकले आहे. या विजनानंतर अविनाशवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या प्रेरणेमुळेच मी हे यश मिळवू शकलो असल्याची भावना अविनाशने व्यक्त केली आहे. या यशानंतर मोदींनीही अविनाशचे अभिनंदन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- VIDEO: ‘०.५ सेंकद की किमत तुम क्या जानो…’, अवघ्या काही क्षणांच्या फरकामुळे हुकले अविनाशचे सुवर्ण पदक

नरेंद्र मोदींनी प्रोत्साहित केलं

पंतप्रधान मोदींनी इथं येण्याअगोदर सगळ्या खेळाडूंशी संवाद साधला होता. त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहित केले. याअधी टोकियो ऑलंपिकमध्ये भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नव्हती. याची खंत मनात होतीच. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धत मी रौप्य पदक जिंकले असले तरी पुढच्या वेळेस मी सुवर्णपदक जिंकण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अविनाश साबळे म्हणाला.

मोदींकडून अविनाशचे अभिनंदन

बर्मिंगहॅम २०२२ कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी अविनाश साबळे यांचे अभिनंदन केले. यासोबतच मोदी यांनी अविनाश साबळे यांच्याशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओही शेअर केला आहे.

‘अविनाश साबळे हा महान युवा खेळाडू आहे. पुरुषांच्या ३०० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत त्याने रौप्य पदक जिंकले याचा मला खूप आनंद आहे. मी माझे नुकतेच झालेले संभाषण शेअर करत आहे ज्यात त्यांनी सैन्यासोबतच्या संबंधांबद्दल चर्चा केली आहे. अविनाशने शेवटी अगणित अडथळ्यांवर कशी मात केली हे सांगितले आहे. त्यांचा जीवन प्रवास अत्यंत प्रेरणादायी असल्याचे म्हणत मोदींनी ट्वीट केले आहे.

हेही वाचा- CWG 2022: सुवर्णपदक जिंकण्यात अपयश आल्याने खेळाडूने रडत मागितली माफी! पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तू…”

केनियाच्या धावपटूंना मागे टाकून अविनाशने रौप्यपद जिंकले

अविनाश आणि अब्राहम किबीवोट यांच्यात अखेरच्या टप्प्यापर्यंत कमालीची चुरस होती. केनियाच्या दोन धावपटूंना मागे टाकून अविनाशने किबीवोटला गाठले होते. अखेरच्या १०० मीटर अंतरावर मात्र किबीओटने वेग घेत साबळेला मागे टाकले. केवळ दशांश ५ सेकंदाच्या फरकाने अविनाशचे सुवर्णपदक हुकले. किबीवोटने ८ मिनिटे, ११.१५ सेकंद, तर अविनाशने ८ मिनिटे, ११.२० सेकंद अशी वेळ नोंदवली.

राष्ट्रीय विक्रम मोडणे फार कठीण नसते, हे आपले शब्द अविनाशने शनिवारी राष्ट्रकुल स्पर्धेतही खरे केले. त्याने गेल्या चार वर्षांत नवव्यांदा स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने सर्वप्रथम २०१८मध्ये भुवनेश्वर येथे राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर यावर्षी मोरोक्कोमध्ये रबाक येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये अविनाशने ८ मिनिटे, १२.६८ सेकंद असा नवा विक्रम साकारला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi always encouraged us to win ays avinash sable after silver win dpj
First published on: 07-08-2022 at 11:58 IST