ललित कालिदास
Prince Yadav Cricket Journey: अफगाणिस्तानचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर सुरु आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे या दोघांना पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. आता दुसऱ्या सामन्यात आयपीएल गाजवणाऱ्या प्रिन्स यादवला पदार्पण करण्याची संधी दिली गेली आहे. त्याची इथपर्यंत वाटचाल जाणून घेऊया.
‘मयांक यादव भारतासाठी खेळला आहे. अवेश खानने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. मोहसीन खान भारतासाठी खेळू शकतो. सचिन तेंडुलकरचा मुलगाही. तुझा नंबर कधी येणार’?
लखनौ सुपरजायंट्स संघाचा हा वेगवान गोलंदाजांचा ताफा. या ताफ्याने राम निवास यादव चक्रावून गेले जसं मुलाच्या आयपीएल कॉन्ट्रॅक्टने गेले होते. त्यांनी प्रत्येक गोलंदाजाचं नाव घेतलं. प्रत्येकजण काय करू शकतो याची त्यांना जाणीव होती.
एप्रिल महिन्यातल्या ढगाळलेल्या दुपारी चहा पिता पिता ते काळजीपूर्वक बोलत होते. त्यांचे भाऊ सुरेंदर आणि विक्रम हेही येऊन बसले होते. कामाच्या स्वरुपामुळे घरी फार लक्ष देता येत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं. निवृत्तीनंतर आता ते खूश आहेत. ते घरी नसण्याचं ठोस कारण म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्समध्ये ते असिस्टंट पोलीस कमिशनर होते. बदलीचा जॉब. त्यामुळे अनेक वर्ष ते घरापासून दूर राहिले. कर्ता माणूस घरात नसणं यामुळे काय होऊ शकतं याची त्यांना जाणीव होती. प्रिन्सने १८व्या वर्षी त्यांना सांगितलं की नोकरीच्या ऐवजी तो क्रिकेट खेळणार आहे. १४५-१५० ताशी वेगाने चेंडू फेकू शकलो तर मला कोण रोखणार?
‘शालेय वर्ष संपल्यावर त्याचं पुढे काय करायचं हे मला कळत नव्हतं’, असं राम निवास सांगतात. ‘त्याला क्रिकेटची आवड होती. आम्ही दरियापूर खुर्द भागात राहतो. आमच्या इथे अकादमी नाहीत. आमच्या कुटुंबात कोणीही कधीही क्रिकेट खेळलेलं नाही. क्रिकेटसाठी मी त्याला पैसे देऊ शकेन असं नाही. कारण या आवडीतून करिअर होऊ शकेल का माहिती नव्हतं. मी त्याला पोलीस भरतीसाठी तयारी सुरू कर म्हटलं. दिल्ली पोलिसांची शारीरिक परीक्षा तो पास झाला पण लेखी परीक्षेला गेलाच नाही’.
प्रिन्सच्या आईला ते एकदा म्हणाले होते की, ‘तू प्रिन्सला बिघवडते आहेस, कारण तू त्याला खेळू देते आहेस’, हे वाक्य आजही त्यांना आठवतं.
प्रिन्सच्या आईने हे वाक्य अनेकदा ऐकलं आहे. त्यांचा प्रिन्सवरचा विश्वास जराही कमी झाला नाही. प्रिन्स भल्या पहाटे उठत असे. आवरून बसने शहरात जात असे. आल्यानंतर खूप दमलेला असे. दुसऱ्या दिवशी पुन्हा उठून जायचं असे. प्रिन्सच्या बाबांना साशंकता होती. पण प्रिन्स करेल असा त्यांना विश्वास होता.
प्रिन्सचं कसं होणार या काळजीने बाबांना झोप लागत नसे. प्रिन्स २१ वर्षांचा झाला होता, त्याच्या वयाची गावातली मुलं पोलीस सेवेत दाखल झाली होती किंवा प्रशासकीय सेवेत प्रवेश करायच्या तयारीत होती. रेल्वे कर्मचारी असल्यामुळे राम निवास यांना पेन्शन मिळत होती. त्यातले पैसे टेनिस बॉल स्पर्धांसाठी जात असत. उत्तर दिल्लीत चांगल्या प्रशिक्षकांचा शोध सुरू होता. अमित वसिष्ठ यांनी प्रिन्समधलं नैपुण्य हेरलं.
काका विक्रम यांनीच प्रिन्स नाव ठेवलं होतं. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे ते घरातले पहिलेच होते. पुतण्याचं नाव नेहमीपेक्षा वेगळं असावं असं त्यांना वाटायचं. गावातल्या मुलाचं हे नाव वाटत नाही.
जांभळाच्या झाडांच्या भवतालात वसिष्ठ यांची अकादमी होती. निसर्गरम्य अशा मैदानात प्रिन्स तासनतास सराव करत असे. प्रिन्सला नैसर्गिक वरदान लाभलं आहे. रबर बॉल क्रिकेटमधून लेदर बॉलमध्ये संक्रमण करायचं होतं. लहान वयातच त्याची प्रतिभा प्रकर्षाने दिसायची. मोठ्या आणि स्पर्धात्मक पातळीवर खेळण्यासाठी जे कौशल्य लागतं ते त्याच्याकडे होतं.
२०१९ वर्ष उजाडलं. दिल्लीत U19 स्पर्धेत खेळण्यासाठी प्रिन्सने खरं वय लपवलं. मूळ वयापेक्षा चार वर्ष लहान असल्याचं दाखवलं. चूक पकडली गेली आणि बीसीसीआयने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली. कुठल्याही प्रकारचा सामना खेळता येणार नाही. काहीच नाही.
‘मला तो दिवस चांगलंच आठवतंय. त्याचं क्रिकेट संपलं, करिअरही संपलं असं वाटलं’, राम निवास सांगतात. त्याला परत कोण कशाला संधी देईल?
वर्षभरात लॉकडाऊन लागला आणि जगावरच कोरोनाचं संकट ओढवलं. ती वर्ष निघून गेली. २०२३ मध्ये प्रिन्स नेट बॉलर होता. अख्खं आयुष्य नोकरी केल्यावर देखील लोकांना निवृत्तीनंतर लोकांना थोडीसीच रक्कम पेन्शन म्हणून मिळत असे. नेट बॉलर म्हणजे त्यांना काहीसं असंच वाटलं.
२०२४ मध्ये दिल्ली प्रीमिअर लीग सुरू झाली असं बोलताना राम निवास यांचा आवाज बदलला. ‘डीपीएल नसती तर प्रिन्स गावातच खेळत राहिला असता. तेच त्याचं भविष्य होतं. डीपीएल स्पर्धेनं त्याचं आयुष्यच बदललं’. ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पुरानी दिल्ली६ संघाकडून खेळताना प्रिन्सने १३ विकेट्स घेतल्या. या स्पर्धेत पहिलीवहिली हॅट्ट्रिक प्रिन्सनेच घेतली. नोव्हेंबर महिन्यात आयपीएल स्पर्धेतल्या लखनौ सुपरजायंट्स संघाने ३० लाख रुपये मोजून त्याला संघात घेतलं.
‘लिलावाच्या वेळी अख्खं कुटुंब टीव्हीसमोर होतं. लिलावकर्त्याने प्रिन्सचं नाव घेतलं पण स्क्रीनवर फोटो वेगळ्याच खेळाडूचा आला. तो बॅट्समन होता. तो गाझियाबादचा होता. आम्हाला वाटलं असं म्हणून ते बोलायचे थांबतात. आम्हाला वाटलं काहीतरी चूक झाली आहे, तो वेगळा मुलगा होता’.
दोन फोन येईपर्यंत गोंधळ सुरू राहिला. पहिला फोन होता लखनौ सुपरजायंट्स संघाचे मालक संजीव गोएंका यांचा. मग घरी फोन झाला.
विक्रम यांनी सांगितलं की, ‘दरियापूर गावातली मंडळी ती रात्र विसरू शकत नाहीत. अख्ख्या गावाला कळलं होतं की आपला प्रिन्स आता आयपीएल खेळणार आहे. पण राम निवास शांत होते कारण दोन वर्षांची बंदीची वर्ष त्यांना आठवली. प्रिन्सने रोज तीन तास केलेला प्रवास आठवला. त्यांच्याकडे नसलेली स्कूटर आठवली’.
‘मी चुकीचा होतो. क्रिकेट खेळून काहीच होणार नाही असं मी त्याला सांगायचो. आमच्यासारख्या खेड्यातून क्रिकेटमध्ये करिअर होऊ शकतं हे मला पटायचं नाही. गेल्या महिन्यात प्रिन्सला भारतीय अ संघाच्या सरावावेळी बोलावण्यात आलं होतं. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो जाऊ शकला नाही. प्रिन्सला मिळालेल्या ट्रॉफीज ते बघतात. तीन वर्षापूर्वी यापैकी काहीही नव्हतं’.
‘प्रिन्स भारताकडून खेळायला हवं. भारताचा टीशर्ट इथे असायला हवा. माझा आता तीच इच्छा आहे’, असं राम निवास सांगतात.
प्रिन्सची आई काहीही न बोलता स्वयंपाकघराच्या दिशेने चालू लागतात. त्यांनी काही म्हणायचीही आवश्यकताही नाही कारण त्यांच्याच पाठिंब्यामुळे प्रिन्स ही वाटचाल करू शकला आहे. राम निवास त्यांचा चहाचा रिकामा कप खाली ठेवतात.
