युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने एंगेजमेंट रद्द झाल्यानंतर काही तासात इन्स्टाग्रावरील सगळ्या पोस्ट डिलिट केल्या असून केवळ एक पोस्ट ठेवली आहे. आकृती अगरवालने पोस्टद्वारे पृथ्वीबरोबरची एंगेजमेंट रद्द झाल्याचं शेअर केलं होतं.

पृथ्वीचे इन्स्टाग्रामवर १.६ मिलिअन फॉलोअर्स आहेत. त्याने ठेवलेली एकमेव पोस्ट २०१६ मधली आहे. सिंहाबरोबर एक माणूस असून वाक्य आहे- work until you no longer have to introduce yourself. एवढं काम करा की तुम्हाला तुमची ओळख करून द्यायला लागता कामा नये अशा आशयाचं वाक्य आहे.

पृथ्वीने ५ टेस्ट, ६ वनडेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. २०१३ मध्ये मुंबई क्रिकेटमधल्या प्रतिष्ठेच्या हॅरिस शिल्डच्या सामन्यात ५४६ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. या खेळीसह पृथ्वीने असंख्य विक्रम रचले. पृथ्वीच्या नेतृत्वात रिझवी स्प्रिंगफिल्ड संघाने २०१२ आणि २०१३ मध्ये हॅरिस शिल्डच्या जेतेपदावर नाव कोरलं. कसोटी पदार्पणातच पृथ्वीने शतक झळकावलं होतं. योगायोग म्हणजे रणजी ट्रॉफी पदार्पणात देखील पृथ्वीने शतकी खेळी साकारली होती. दुलीप ट्रॉफी पदार्पणातही शतक झळकावत पृथ्वीने अनोखा विक्रम नावावर केला होता.

दमदार सुरुवात होऊनही पृथ्वीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट बहरलं नाही. २०२१ नंतर तो भारतीय संघासाठी खेळलेला नाही. आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला ताफ्यात सामील केलं होतं. मात्र अंतिम अकरासाठी त्याचा विचार झाला नाही. मध्यंतरीच्या काळात पृथ्वीने मुंबईऐवजी महाराष्ट्र संघाकडून खेळायचा निर्णय घेतला.

पृथ्वी शॉचा साखरपुडा ६ महिन्यांतच मोडल्याची घोषणा त्याची गर्लफ्रेंड आकृती अग्रवाल हिने केली होती. पृथ्वी शॉने काही महिन्यांपूर्वीच इन्फ्लुएन्सर व अभिनेत्री आकृती अग्रवाल हिच्याबरोबर साखरपुडा केल्याचे फोटो शेअर केले होते. आता आकृती अग्रवालने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत साखरपुडा मोडल्याचं जाहीर केलं आहे.

पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांचा ८ मार्च २०२६ रोजी साखरपुडा झाला होता. या जोडप्याने २७ ऑगस्ट २०२५ मध्ये गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. आता, साखरपुड्यानंतर सहा महिन्यांनी दुर्देवाने गणेशोत्सवाच्या सणादरम्यान दोघेही वेगळे झाल्याची घोषणा केली आहे.

पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांचा ८ मार्च २०२६ रोजी साखरपुडा झाला होता. या जोडप्याने २७ ऑगस्ट २०२५ मध्ये गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. आता, साखरपुड्यानंतर सहा महिन्यांनी दुर्देवाने गणेशोत्सवाच्या सणादरम्यान दोघेही वेगळे झाल्याची घोषणा केली आहे.

तिने पुढे लिहिलं, “यापुढील आयुष्यात आम्हा दोघांनाही सुख, शांती आणि आनंद मिळावा, हीच माझी मनापासून इच्छा आहे.” तिने पुढे म्हटलं, “या कठीण काळात कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. आमच्या निर्णयामागील कारणांबाबत कोणत्याही प्रकारचे अंदाज किंवा तर्क लावू नका, ही नम्र विनंती. आम्हाला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.”

पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी मार्च २०२६ मध्ये त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि सोशल मीडियावर त्या समारंभाचे फोटो शेअर केले. त्यानंतर जुलैमध्ये, आकृती अग्रवालच्या काही सोशल मीडिया पोस्ट्समुळे लोकांचे लक्ष त्यांच्या नात्याकडे वेधलं गेलं आणि त्यावरून विविध तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले. त्यावेळी, त्या पोस्ट्सचा पृथ्वी शॉ याच्याशी अधिकृतपणे कोणताही संबंध जोडला गेला नव्हता. पण पृथ्वी शॉने तिची फसवणूक केली का, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. त्यावरून त्या दोघांच्या नात्यामध्ये अंतर आल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं.