टीम इंडियातून वगळण्यात आलेला सलामीवीर पृथ्वी शॉने द्विशतक झळकावून निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पृथ्वीने आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात (Mumbai vs Assam) द्विशतक झळकावले. उजव्या हाताचा फलंदाज पृथ्वीने आसामविरुद्ध २३५ चेंडूत द्विशतक झळकावले. त्याने आपल्या सर्वोत्तम खेळीत २८ चौकार आणि एक षटकार लगावला. हे त्याच्या रणजी कारकीर्दीतील दुसरे द्विशतक आहे.

२३ वर्षीय पृथ्वीने २८३ चेंडूत २४० धावा केल्या. या दरम्यान त्याने ३३ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याने उपाहारापूर्वी त्याने १०७ चेंडूत शतक पूर्ण केले होते. २०२३ वर्षाची सुरुवात, पृथ्वीसाठी यापेक्षा चांगले काय असू शकते. यादरम्यान पृथ्वीने प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्याही पार केली आहे. याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या २०२ होती, जी त्याने पार केली आहे.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
The High Court reprimanded the government to be sensitive to the demand for the house of the eyewitnesses of the 26 11 attacks Mumbai news
२६/११ हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शीच्या घराच्या मागणीबाबत संवेदनशीलता दाखवा; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सामन्याबद्दल बोलायचे तर, आसाम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण मिळाले होते. ज्यामध्ये मुंबई संघाकडून पृथ्वी शॉने सर्वाधिक नाबाद २४० धावा केल्या. त्यामुळे मुंबई संघ ९० षटकांच्या समाप्तीनंतर २ बाद ३९७ धावा करु शकला. आसाम संघाकडून मुख्तार हुसेनने एक विकेट घेतली.

पृथ्वी शॉने ९ पुरस्कार जिंकले –

काही काळ निवडकर्त्यांकडून दुर्लक्ष केल्याबद्दल पृथ्वीने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पुरस्कार सोहळ्यात पृथ्वीला नुकतेच एकूण ९ पुरस्कार प्रदान करण्यात आले. गेल्या काही काळापासून तो मुंबईकडून खेळताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे.

हेही वाचा – IND vs SL 1st ODI: रोहित शर्मावर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील एका सदस्याचे झाले निधन

पृथ्वीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –

पृथ्वीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, २०१८ मध्ये पदार्पण करणाऱ्या या खेळाडूने आतापर्यंत ५ कसोटी सामन्यांमध्ये ३३९ धावा केल्या आहेत, ज्यात २ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. पृथ्वीच्या नावावर ६ वनडेत १८९ धावा आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ४९ धावा आहे. पृथ्वी शॉ जुलै २०२१ पासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून बाहेर आहे.