आयपीएल २०२६ स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने पूर्ण झाले आहेत. तर दुसरूस टप्प्यातील सामन्यांना सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील ४३ वा समान सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात प्लेईंग ११ चा भाग नसलेल्या पृथ्वी शॉ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सकडून जवळपास सर्वच संघांना संधी दिली गेली आहे. पण पृथ्वी शॉ अजूनही आपल्या संधीच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आक्रमक फलंदसीसाठी ओळखला जाणारा पृथ्वी शॉ आयपीएलच्या लिलावातील पहिल्या टप्प्यात अन्सोल्ड राहिला होता. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या संघात स्थान दिलं. त्यामुळे यावेळी पृथ्वी शॉ दमदार पुनरागमन करणार असं वाटलं होतं. पण दिल्ली कॅपिटल्सने त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिलेली नाही. प्लेईंग ११ चा भाग नसलेला पृथ्वी शॉ डगआऊटमध्ये बसून ’चिमणी उड, कावळा उड..’, हा खेळ खेळताना दिसून आला आहे. हे दृश्य कॅमेरामनने आपली कॅमेऱ्यात कैद केले. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
पृथ्वी शॉ याआधीही दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. पण त्याच्या फ्लॉप कामगिरीमुळे त्याला संघातून रिलीज करण्यात आले होते. आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये पृथ्वी शॉची बेस प्राईझ ७५ लाख रुपये होती. आधी तो अन्सोल्ड राहिला होता. त्यानंतर पुढच्या फेरीत दिल्ली कॅपिटल्सने त्याला ७५ लाखांच्या किमतीत आपल्या संघात स्थान दिलं. एकेकाळी पृथ्वी शॉ ची तुलना ही सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा सारख्या दिग्गज खेळाडूंसोबत केली जायची. पण आता त्याला संघात स्थान मिळणंही कठीण झालं आहे.
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने २२५ धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान कर्णधार रियान परागने सर्वाधिक ९० धावांची खेळी केली. तर ध्रुव जुरेलने ४२ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. तर पथूम निसांकाने ६२ धावांची खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला.
