scorecardresearch

Prithvi Shaw: “मी काय…सीधे इग्नोर कर देते हु”, सोशल मीडिया ट्रोलिंगला भारताचा स्टार पृथ्वी शॉ ने केला खुलासा

भारताचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉ याने सोशल मीडियावर टीका आणि ट्रोलिंगला कसे प्रत्युतर देतो याबाबत एका मुलाखती दरम्यान खुलासा केला आहे.

Prithvi Shaw: “मी काय…सीधे इग्नोर कर देते हु”, सोशल मीडिया ट्रोलिंगला भारताचा स्टार पृथ्वी शॉ ने केला खुलासा
संग्रहित छायाचित्र (इंडियन एक्सप्रेस)

भारताचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ याने बुधवारी आसामविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात केवळ ३८३ चेंडूंत अविश्वसनीय ३७९ धावांची खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. गुवाहाटी येथे त्रिशतक झळकावताना शॉ ने ४९ चौकार आणि चार षटकारांचा साज चढवला. त्याच्या बॅटने अप्रतिम फटके मारत विरोधी संघाला सळो की पळो करून सोडले. त्याच्या या विस्फोटक खेळीने बीसीसीआय निवड समितीला दखल घेण्यास भाग पाडले. २३ वर्षीय खेळाडूच्या धडाकेबाज खेळीमुळे मुंबईने ६८७/४ वर पहिला डाव घोषित केला.

पृथ्वी शॉ ने २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध टी२० आंतरराष्ट्रीय प्रकारात भारतीय संघासाठी शेवटचा खेळलेला, खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये टीम इंडियात त्याला दोन वर्षापासून स्थान मिळालेले नाही. या काळात, शॉ ने मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. तसेच इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल मध्येही तो उत्कृष्ट कामगिरी करत होता.

हेही वाचा: Ramiz Raja on BCCI: “BCCI भाजपाच्या हातातील…!” पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्षांचे वादग्रस्त विधान

टीम इंडियाच्या संघातून वारंवार काढून टाकल्यानंतर, शॉ ने अनेकदा त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम प्रोफाइलवर राष्ट्रीय निवडीसाठी विचार न केल्याबद्दल निराशाजनक गोष्टी पोस्ट केल्या आहेत. स्पोर्टस्टारला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, शॉने स्नब्सनंतर सोशल मीडियावर त्याला होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल खुलासा केला. त्यांनी प्रश्न विचारला त्याला की, “चाहत्यांच्या कठोर टीकेमुळे तो खूप दुखावला जातो तरी तू त्यांना उलटून उत्तर देत का नाहीस?” यावर तो म्हणाला की, “ मी त्यांना नेहमी आग्रह करतो की एवढ मनाला लागेल असे बोलत जाऊ नका याने समोरची व्यक्ती दुखावते. मात्र मी कधीच त्यांना दुखावणार नाही हे माझ्या आई-वडिलांकडून शिकलो आहे.”

पुढे तो शॉ म्हणाला की, “शेवटी मी काय करू शकतो? (सिधा दुर्लक्ष कर देता हूं) मी फक्त दुर्लक्ष करतो. मी अशी व्यक्ती नाही ज्याला लोकांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलायला आवडतात. काही वेळा, जेव्हा तुम्ही तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पाहता किंवा तशा प्रकारच्या लोकांना भेटता तेव्हा खूप त्रास होतो. परंतु तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये असे अडथळे येणे आणि तुमच्या स्वतःच्या त्यानुसार तुम्ही स्वतः मध्ये बदल करून अनुसरण करणे आवश्यक आहे.”

हेही वाचा: Rishabh Pant on IPL: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! ऋषभ पंतच्या बाबतीत संचालक सौरव गांगुलीने दिली मोठी अपडेट

“जोपर्यंत मी माझ्या उत्तम प्रदर्शन करत आहे यामुळे माझ्या आयुष्यात सगळे व्यवस्थित होत आहे तोपर्यंत मी ठीक आहे. मी काय लिहिले किंवा बोलले जात आहे याची काळजी करत नाही. (अगर मैं सही हूं) जर मी बरोबर आहे, तर मग कोणी सोशल मीडियावर काहीही म्हणत असेल त्याचा, (मुझे कोई फराक नही पडता) मला काहीही फरक पडत नाही,” असे पृथ्वी शॉ पुढे म्हणाला. २०२१/२२ रणजी ट्रॉफीमध्ये, शॉने मुंबई संघाला अंतिम फेरीत नेले होते; मात्र, संघाला विजेतेपदाच्या लढतीत मध्य प्रदेशकडून पराभवाचा सामना करावा लागला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 18:28 IST

संबंधित बातम्या