खासगी विमानाने ब्रिटनला जाण्याचा पर्याय -मॅक्सवेल

भारतामधील करोना रुग्णसंख्या वाढल्याने ऑस्ट्रेलियाने हवाई वाहतूक बंदी जारी केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू इंग्लंड, भारत आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंसह खासगी विमानाने ब्रिटनला प्रयाण करतील, अशी माहिती अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने दिली.

भारतामधील करोना रुग्णसंख्या वाढल्याने ऑस्ट्रेलियाने हवाई वाहतूक बंदी जारी केली आहे. त्यामुळे व्यावसायिक विमाने भारतामधून ऑस्ट्रेलियाला जाऊ शकणार नाहीत. ‘‘मायदेशी कसे जायचे, याबाबत ‘बीसीसीआय’ दोन्ही सरकारांशी चर्चा करून मार्ग काढत आहे. ‘आयपीएल’ संपल्यानंतर इंग्लंडसह मायदेशी परतणार आहे, तर भारत, न्यूझीलंडचे संघ जागतिक अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळण्यासाठी जाणार आहे. या संघांसह आम्ही इंग्लंडला जाऊ,’’ असे मॅक्सवेलने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Private jet option available to uk abn