आयपीएल २०२६ स्पर्धेतील १७ वा सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. पंजाबच्या होम ग्राऊंडवर सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या हैदराबादच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. हैदराबादने पंजाबसमोर विजयासाठी २२० धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरनने दमदार सुरुवात केली. यादरम्यान अर्धशतकी खेळी करताच प्रियांश आर्यच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे .

पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाबला चांगल्या सुरुवातीची गरज होती. ती सुरुवात प्रियांश आणि प्रभसिमरने मिळून करुन दिली. या जोडीने मिळून पावरप्लेच्या षटकांमध्ये ९३ धावा जोडल्या. यादरम्यान प्रियांश आर्यने अवघ्या १६ चेंडूत दमदार अर्धशतक झळकावलं. हे आयपीएल २०२६ स्पर्धेतील दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं आहे. याआधी वैभव सूर्यवंशीने १५ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.

प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या दोघांनी मिळून पंजाबला जशी हवी होती, तशी सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ९९ धावा जोडल्या. पावरप्लेच्या षटकांमध्ये दोघांनी मिळून ९३ धावा जोडल्या. प्रियांश आर्यने २० चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकांराच्या साहाय्याने ५७ धावांची खेळी केली. त्याने १६ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे आयपीएल २०२६ स्पर्धेतील दुसरं वेगवान अर्धशतक आहे. याआधी वैभव सूर्यवंशीने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना करताना अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.

हैदराबादने उभारला २१९ धावांचा डोंगर

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या हैदराबाने २० षटकांअखेर ६ गडी बाद २१९ धावा केल्या. हैदराबादकडून सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने १८ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. त्याने २८ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या साहाय्याने ७४ धावांची खेळी केली होती. तर ट्रॅव्हिस हेडने ३८ धावांची खेळी केली. दोघांनी पावरप्लेच्या षटकांमध्ये १०० धावा जोडल्या. इशान किशनने २७, हेनरिक क्लासेनने ३९, अनिकेत वर्माने २८ धावांची खेळी केली.