प्रो कबड्डी लीगच्या ८०व्या सामन्यात, पाटणा पायरेट्सने तामिळ थलायवासचा एकतर्फी सामन्यात ५२-२४ असा पराभव केला आहे. पाटणाने १२ सामन्यांमध्‍ये आठव्या विजयासह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. तामिळ थलायवासचा १३ सामन्यांमधला हा चौथा पराभव असून ते १०व्या स्थानावर आहेत. पाटणाच्या बचावफळीने शानदार खेळ केला आणि तीन खेळाडूंनी हाय ५ पूर्ण करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. पाटणा पायरेट्सने डिफेन्समध्ये विक्रमी २१ गुण मिळवत इतिहास रचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्याची सुरुवात अतिशय संथ झाली होती आणि दोन्ही संघांनी सावधपणे खेळण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या १० मिनिटांच्या खेळानंतर दोन्ही संघांचे प्रत्येकी आठ गुण होते. दोन्ही संघांच्या डिफेन्सला प्रत्येकी तीन टॅकल पॉइंट मिळाले आणि चढाईतही दोघांना प्रत्येकी समान चार गुण मिळाले. दोन्ही संघांना प्रत्येकी एक अतिरिक्त गुण मिळाला. मोनू गोयतने सर्वाधिक तीन रेड पॉइंट घेतले.

१३व्या मिनिटाला थलायवास ऑल आऊट झाल्यानंतर पटनाने सात गुणांची आघाडी घेतली होती. ही आघाडी मिळाल्यानंतर पाटणाने मागे वळून पाहिले नाही आणि पहिल्या हाफ टाईमपर्यंत नऊ गुणांची आघाडी घेतली होती. प्रशांत कुमार रायने पटनाला चार गुणांसह मोठी आघाडी मिळवून दिली. सागरने थलायवाससाठी तीन टॅकल पॉइंट घेतले आणि तो संघाचा सर्वात यशस्वी बचावपटू ठरला.

मोहम्मदर्झा शाडलूनेही पाटणाच्या बचावात हाय ५ पूर्ण केले. ३३व्या मिनिटाला पाटणा पायरेट्सने सामन्यात तिसऱ्यांदा तमिळ थलायवासला ऑलआउट केले आणि स्कोअर ३८-१९ असा झाला. ३७व्या मिनिटाला पाटणा पायरेट्सने पुन्हा एकदा विरोधी संघाला ऑलआउट केले, नीरज आणि सुनील कुमार यांनीही पाटणा पायरेट्सच्या डिफेन्समध्ये हाय ५ पूर्ण केले.

दरम्यान, पाटणा पायरेट्सने त्यांचा शेवटचा सामना १८ जानेवारी रोजी खेळला होता. त्यानंतर १० दिवसांनी शानदार विजयासह स्पर्धेत पुनरागमन केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi 2021 patna pirates vs tamil thalaivas latest score updates abn
First published on: 28-01-2022 at 21:35 IST