पुणेरी पलटणने प्रो कबड्डी लीगच्या ७९ व्या सामन्यात यूपी योद्धाचा ४४-३८ असा पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला. या विजयासह पुणेरी पलटणचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर पोहोचला असून यूपी योद्धाचा संघ सातव्या स्थानावर कायम आहे. नितीन तोमरच्या नेतृत्वाखालील पुणेरी पलटणने यूपी योद्धाचा सहा गुणांनी पराभव केला. पुण्याने चालू मोसमातील सातवा विजय नोंदवला तर यूपीचा हा सहावा पराभव आहे. रेडर्स मोहित गोयत आणि अस्लम इनामदार यांनी पुण्यासाठी चमकदार कामगिरी केली आणि दोघांनीही एकूण २६ गुण मिळवत विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या प्रो कबड्डी लीगच्या या सामन्यात पुण्याने पूर्वार्धातच ३ गुणांची आघाडी घेतली होती. पहिल्या हाफमध्येच पुण्याने २१ तर यूपीने १८ गुण मिळवले. दोन्ही संघांनी चढाईत १३-१३ गुण मिळवले, तर पुण्याने टॅकलमध्ये पाच गुण मिळवले. दुसऱ्या हाफमध्ये पुण्याने यूपीपेक्षा तीन गुण जास्त मिळवले. सुरेंदर गिलने पुन्हा एकदा मल्टी पॉइंट चढाई केली आणि पुणेरी पलटणच्या बचावातही अनेक चुका झाल्या. मात्र, पुणेरी पलटणच्या बचावफळीने निर्णायक क्षणी युपी योद्धाच्या तीन रेडर्सना बाद करून संघाला निश्‍चित केले. सरतेशेवटी, पुणेरी पलटणने हा सामना जिंकून सलग तिसरा विजय मिळवला असून यूपीचा हा सलग दुसरा पराभव आहे. युपी योद्धाला या सामन्यातून केवळ एक गुण मिळाला

kanhaiya kumar latest marathi news
“आश्वासनांचे अपयश लपविण्यासाठीच पंतप्रधान मोदींकडून ४०० पारचा नारा”, काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांची टीका
Uday Samant, Uddhav thackeray, Uddhav thackeray working style, Uday Samant criticise Uddhav thackeray, party mla left Uddhav thackeray, victory Confidence in mahayuti, lok sabha 2024,
“…म्हणून आम्ही सगळ्यांनी शिंदेंसह उठाव केला”; उदय सामंत यांनी नागपुरात सांगितली……
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल

पहिल्या हाफनंतर पुणेरी पलटणने यूपी योद्धाविरुद्ध २१-१८ अशी आघाडी घेतली. अस्लम होंडरने आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. अस्लमने फक्त सुपर रेड मारून तीन गुण मिळवले नाहीत तर टॅकलद्वारे दोन गुणही मिळवले. अस्लमला मोहित गोयतची चांगली साथ लाभली. यामुळे पुणेरी पलटणने यूपी योद्धाला अतिशय झटपट ऑलआऊट केले. मात्र, यूपी योद्धानेही जबरदस्त पुनरागमन करत आणि फस्ट हाफ संपण्यापूर्वी पुणेरी पलटणमधील सर्वांना बाद केले. पुणेरी पलटणने २० मिनिटे संपेपर्यंत आघाडी कायम ठेवली होती.

पुणेरी पलटणने दुसऱ्या हाफमध्ये धमाकेदार सुरुवात केली आणि त्यांनी यूपीला दुसऱ्यांदा ऑलआऊट केले. दरम्यान, मोहित गोयतनेही सुपर १० पूर्ण केला. प्रदीप नरवालने यूपीसाठी फारसे काही केले नाही, पण त्याने सुपर रेड टाकून आपल्या संघाला सामन्यात परत आणले. मात्र, यूपीच्या बचावपटूंनी चांगली कामगिरी केली नाही. सुरेंदर गिलने सुपर रेड टाकताना चार रेड पॉइंट मिळवले आणि यूपीचा संघ पुणेरी पलटणच्या जवळ आला. त्यानंतर सुरेंदर गिलने त्याच्या पुढच्या चढाईत पुणेरी पलटणला ऑल आऊट करून पुण्याच्या दोन्ही बचावपटूंना बाद केले. यादरम्यान गिलने सुपर १० पूर्ण केला.

दरम्यान, पॉईंट टेबलमध्ये पुणे संघ १४ सामन्यांत सात विजय आणि पराभवानंतर ३७ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. यूपीच्या संघाचे १४ सामन्यांत पाच विजय मिळवत ४० गुण आहेत. यूपीला आतापर्यंत सहा सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.