प्रो कबड्डी लीग : जयपूरच्या विजयात दीपक चमकला

दीपक नरवालच्या चतुरस्र चढायांच्या बळावर जयपूर पिंक पँथर्सने बेंगळूरु बुल्सचा ४१-३४ असा पराभव केला

जयपूर पिंक पँथर्सचा चढाईपटू दीपक नरवाल गुण मिळवण्याच्या प्रयत्नात.

पंचकुला : दीपक नरवालच्या चतुरस्र चढायांच्या बळावर जयपूर पिंक पँथर्सने बेंगळूरु बुल्सचा ४१-३४ असा पराभव केला.  दीपकने चढायांचे १६ गुण मिळवले. निलेश साळुंखेने नऊ  गुण मिळवून त्याला अप्रतिम साथ दिली. बेंगळूरुकडून पवन  शेरावतने चढायांचे १४ गुण मिळवले. परंतु तो संघाचा पराभव टाळू  शकला नाही.

दुसऱ्या सामन्यात हरयाणा स्टीर्सने तेलुगू टायटन्सचा ५२-३२ असा पाडाव केला. विकास खंडोलाने नेत्रदीपक चढाया करीत १३ गुण मिळवले. विनय (८ गुण) आणि रवी कुमार (७ गुण) यांनी त्याल अप्रतिम साथ दिली. तेलुगू टायटन्सच्या सिद्धार्थ देसाईने चढायांचे १२ गुण मिळवले.

आजचे सामने

’ यूपी योद्धा वि. दबंग दिल्ली ’ गुजरात फॉच्र्युनजायंट्स वि. पाटणा पायरेट्स

’ वेळ : सायं. ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण :  स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स २,

स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ मराठी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व pro kabaddi league बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pro kabaddi league jaipur pink panthers bengaluru bulls zws

ताज्या बातम्या