विवो प्रो कबड्डी लीग २०२२ च्या आयोजकांनी नवव्या हंगामाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या वेळी लीग ७ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होईल आणि डिसेंबरच्या मध्यापर्यंत चालेल. लीग टप्पा बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद येथे आयोजित केला जाईल. विवो पीकेएल हंगाम ९ च्या घोषणेनंतर, लीग कमिशनर अनुपम गोस्वामी यांच्या हस्ते मशाल स्पोर्ट्स पेटवून या लीगचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, “कबड्डी या स्वदेशी खेळाला समकालीन इतर खेळांबरोबर आणि क्रीडा चाहत्यांच्या भावी पिढ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हा उपक्रम आपण दरवर्षी करत असतो. कबड्डी हा खेळ जगासमोर नेण्याच्या दृष्टीकोनातून विवो प्रो कबड्डी लीगचा प्रवास सुरू केला आहे.”

आयोजकांनी सांगितले की आगामी हंगामात प्रेक्षक परत येतील, कारण हंगाम ८ जवळजवळ संपूर्णपणे प्रेक्षकांविना आयोजित करण्यात आला होता. अनुपम गोस्वामी म्हणाले, “आम्ही आगामी पीकेएल हंगाम ९ बद्दल अधिक उत्सुक आहोत कारण आमचे चाहते बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद येथील स्टेडियममध्ये त्यांच्या आवडत्या संघ आणि स्टार्सच्या थरारक खेळीचा अनुभव घेण्यासाठी परततील.” बंगळुरू येथील श्री कांतिवीरा इंडोर स्टेडियम येथे ७ ऑक्टोबरपासून पहिले सत्र सुरु होणार असून पुण्यातील बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुलात (बॅडमिंटन हॉल) २८ऑक्टोबरपासून स्पर्धेचा उत्तरार्ध पार पडणार आहे.

series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
mumbai passengers marathi news, local train marathi news
सुट्टीकालीन लोकल वेळापत्रकाने प्रवासी हैराण, गुड फ्रायडेच्या दिवशी लोकलचा खोळंबा
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
IIIT Pune
आयआयआयटी पुणेमध्ये प्रवेशाच्या जागांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ, डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत उद्या पहिला पदवी प्रदान समारंभ

हेही वाचा  :संजू सॅमसनचे अर्धशतक!, लॉर्ड ठाकूर आणि तिलक वर्मा यांचीही शानदार फटकेबाजी

या मौसमात प्रो कबड्डी लीगमध्ये चाहत्याना पुन्हा थेट स्टेडियम मध्ये हजर राहता येणार आहे. भव्य उदघाटन सोहळ्यानंतर क्रीडा प्रेमींना पहिल्या तीन दिवसांतच तिहेरी सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. पहिल्या ६६ सामन्यांच्या वेळापत्रकामध्ये पहिल्या दोन दिवसातच सर्व १२ संघ मैदानावर उतरणार आहेत. इतकेच नव्हे तर प्रो कबड्डी लीगच्या साखळी फेरीत दार शुक्रवार व शनिवारी तीन-तीन सामने रंगणार आहेत.

हेही वाचा  :ज्युलियस बेअर बुद्धिबळ स्पर्धा : कार्लसनकडून अर्जुन पराभूत

उदघाटनाची पहिल्याच दिवशी गतविजेता दबंग दिल्ली विरुद्ध यु मुंबा हि लढत ७ ऑक्टोबर रोजी होणार असून त्याच दिवशी दुसरा सामना बंगळुरू बुल्स विरुद्ध तेलगू टायटन्स यांच्यात तर तिसरी लढत युपी योद्धाज विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स यांच्यात होणार आहे. दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक ऑक्टोबर अखेर जाहीर करण्यात येणार असून त्यामुळे पहिल्या सत्रातील कामगिरीच्या आधारावर सर्व संघांना डावपेचात बदल करता येणार आहे.