मुंबई : पवन शेरावत आणि प्रदीप नरवाल हे तारांकित चढाईपटू प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामासाठी ५ आणि ६ ऑगस्टला होणाऱ्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेसाठी उपलब्ध असतील. पवन आणि प्रदीप मागील हंगामात अनुक्रमे बेंगळूरु बुल्स आणि यूपी योद्धाज संघाकडून खेळले होते.

लिलावाआधी १९ विशेष खेळाडूंना १० संघांनी कायम राखले आहे. हरयाणा स्टीलर्स आणि तेलुगू टायटन्स या दोन संघांनी एकाही खेळाडूला कायम राखलेले नाही. तीन गटांमधून कायम राखलेल्या खेळाडूंची एकूण संख्या १११ इतकी आहे. याशिवाय १३ खेळाडूंना युवा गटातून आणि ३८ खेळाडूंना नव्या युवा गटातून संघांनी पुन्हा स्थान दिले आहे.

कायम राखलेले खेळाडू

बंगाल वॉरियर्स : मिणदर सिंग, मनोज गौडा, आकाश पिकलमुंडे; बेंगळूरु बुल्स : महेंदर सिंग, मयूर कदम, जीबी मोरे; दबंग दिल्ली : विजय; गुजरात जायंट्स : सोनू; जयपूर िपक पँथर्स : अर्जुन देस्वाल, साहूल कुमार; पाटणा पायरेट्स : मोहम्मदरेझा शाडलोई, साजिन चंद्रशेखर, नीरज कुमार, मोनू; पुणेरी पलटण : सोमबिर, अबिनेश नदराजन;

तमिळ थलायव्हाज : अजिंक्य पवार; यू मुंबा : िरकू; यूपी योद्धा : नितेश कुमार