scorecardresearch

प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटणची यूपी योद्धाशी गाठ

पुणेरी संघाने साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी जयपूर पिंक पँथर्सला धूळ चारत स्पर्धेतील आव्हान कायम राखले.

प्रो कबड्डी लीगच्या बाद फेरीचा थरार आजपासून; गुजरातपुढे बंगळूरुचे आव्हान

बंगळूरु : अखेरच्या साखळी लढतीतील विजयासह बाद फेरी गाठणारा पुणेरी पलटणचा संघ प्रो कबड्डी लीगमधील विजयी घोडदौड कायम राखण्यास उत्सुक आहे. सोमवारी पहिल्या ‘एलिमिनेटर’ सामन्यात पुणेरी संघापुढे यूपी योद्धाचे आव्हान असेल. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

पुणेरी संघाने साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी जयपूर पिंक पँथर्सला धूळ चारत स्पर्धेतील आव्हान कायम राखले. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना ‘एलिमिनेटर-१’च्या सामन्यात यूपीला नमवावे लागेल. साखळी फेरीअंती पुणेरी संघ गुणतालिकेत सहाव्या, तर यूपीचा संघ तिसऱ्या स्थानावर होता. यूपीच्या संघात प्रदीप नरवाल आणि सुरेंदर गिल यांसारख्या दर्जेदार चढाईपटूंचा समावेश आहे. पुणेरी संघाची मोहित गोयत आणि अस्लम इनामदार यांच्यावर भिस्त असेल. या सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत पाटणा पायरेट्सशी दोन हात करेल.

सोमवारीच होणाऱ्या ‘एलिमिनेटर-२’च्या लढतीत गुजरात जायंट्स आणि बंगळूरु बुल्स हे संघ आमनेसामने येतील. गुजरातला या सामन्यात बंगळूरुचा तारांकित चढाईपटू पवन कुमार शेरावतला रोखण्याचे आव्हान असेल. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत दबंग दिल्लीविरुद्ध खेळेल.

’ वेळ : सायंकाळी ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, १ हिंदी

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pro kabaddi league puneri paltan fight against up warriors zws