scorecardresearch

प्रो कबड्डी लीग : दबंग दिल्लीसमोर यू मुम्बाची हाराकिरी

कर्णधार नवीन कुमारच्या (१३ गुण) आक्रमक चढाया आणि बचाव फळीने केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर गतविजेत्या दबंग दिल्लीने प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामातील सलामीच्या सामन्यात यू मुम्बावर ४१-२७ असा विजय साकारला.

प्रो कबड्डी लीग : दबंग दिल्लीसमोर यू मुम्बाची हाराकिरी
प्रो कबड्डी लीग : दबंग दिल्लीसमोर यू मुम्बाची हाराकिरी

संदीप कदम

बंगळूरु : कर्णधार नवीन कुमारच्या (१३ गुण) आक्रमक चढाया आणि बचाव फळीने केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर गतविजेत्या दबंग दिल्लीने प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामातील सलामीच्या सामन्यात यू मुम्बावर ४१-२७ असा विजय साकारला. कंटिरावा इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात युवा खेळाडूंचा समावेश असलेला यू मुम्बाचा संघ सुरुवातीपासूनच दडपणाखाली दिसला. चढाईपटू गुणांची कमाई करीत होते, पण त्यांना बचाव फळीकडून म्हणावी तशी साथ मिळली नाही. दुसरीकडे, दिल्लीकडून चढाईपटूंचा आक्रमक खेळ सुरू राहिला आणि त्यांनी मूम्बावर लोण देण मध्यंतराला १९-१० अशी आघाडी घेतली.

उत्तरार्धातही दिल्लीच्या खेळाडूंनी खोलवर चढाया आणि अचूक पकडी करीत आघाडी कायम राखली. त्यांनी यू मुम्बाला पुनरागमनाची कोणतीच संधी दिली नाही. मुम्बाकडून चढाईपटू आशिषने सर्वाधिक सात गुणांची कमाई केली.

बंगळूरुची तेलुगूवर सरशी

नीरज नरवाल (५ गुण), भरत (५ गुण) आणि विकाश कंडोला (५ गुण) यांनी चढाईत केलेल्या जोरदार कामगिरीमुळे यजमान बंगळूरु बुल्स संघाने तेलुगू टायटन्सवर ३४-२९ अशी मात केली. मध्यंतराला दोन्ही संघांत १७-१७ अशी बरोबरी होती. दुसऱ्या सत्रात बंगळूरुने आपला खेळ उंचावत विजय निश्चित केला. तेलुगूकडून विनय आणि रजनीश यांनी चांगली झुंज दिली.

यूपीचा जयपूरवर विजय

सुरेंदर गिल (९ गुण) आणि प्रदीप नरवाल (७ गुण) यांच्या आक्रमक चढायांच्या जोरावर यूपी योद्धाजने प्रो कबड्डीच्या पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सामन्यात जयपूर पँक पँथर्सवर ३४-३२ असा विजय मिळवला. मध्यंतराला जयपूरकडे १५-१२ अशी आघाडी होती, पण उत्तरार्धात यूपीने दमदार पुनरागमन करत विजय नोंदवला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-10-2022 at 01:15 IST

संबंधित बातम्या