पाटणा पायरेट्सच्या विजयात प्रदीप चमकला

दुसऱ्या सामन्यात यूपी योद्धाने पुणेरी पलटणला ४३-३९ अशा फरकाने हरवले.

बंगाल वॉरियर्सविरुद्ध यशस्वी चढाई करताना प्रदीप नरवाल

प्रदीप नरवालच्या चौफेर चढायांच्या बळावर तीन वेळा विजेत्या पाटणा पायरेट्सने रविवारी प्रो कबड्डी लीगमध्ये गतविजेत्या बंगाल वॉरियर्सला ६९-४१ अशी धूळ चारली.

शहीद विजय सिंग पथिक क्रीडा संकुलात झालेल्या या सामन्यात प्रदीपने ३६ गुणांची कमाई करीत सातव्या हंगामात गुणांचे त्रिशतक ओलांडण्याची किमया साधली. आता त्याच्या खात्यावर ३०२ गुण जमा आहेत. पाटणा पायरेट्सने सर्वाधिक गुणांच्या आपल्या विक्रमाची बरोबरी साधली. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ११० गुण कमवत आणखी एक विक्रम नोंदवला.

दुसऱ्या सामन्यात यूपी योद्धाने पुणेरी पलटणला ४३-३९ अशा फरकाने हरवले. यूपी योद्धाच्या विजयात रिशांक देवाडिगा (७ गुण) आणि नितेश कुमार (६ गुण) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

आजचे सामने

तेलुगू टायटन्स वि. गुजरात फॉर्च्युनजायंट्स

तमिळ थलायव्हाज वि. जयपूर पिंक पँथर्स

वेळ : सायंकाळी ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ मराठी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pro kabaddi league victory of patna pirates abn

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या