प्रो कबड्डी लीग २०२२ मध्ये मंगळवारी दोन सामने खेळले गेले. दिवाळीच्या सुट्टीनंतरचे दोन्ही सामने शानदार झाले. पहिल्या सामन्यात पुणेरी पलटणने जयपूर पिंक पँथर्सचा पराभव करून मोसमातील सलग चौथा विजय मिळवला. या पराभवापूर्वी जयपूरने सलग पाच सामने जिंकले होते. दुसऱ्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने शानदार खेळ दाखवत तेलुगू टायटन्सचा पराभव केला. सलग चार पराभवानंतर हरियाणाला पहिला विजय मिळाला.

मोसमातील दुसऱ्या पराभवानंतर जयपूर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आला आहे. दबंग दिल्ली आणि जयपूरचे २६-२६ गुण आहेत, मात्र दिल्लीने जयपूरपेक्षा एक सामना कमी खेळला आहे. सलग चौथ्या विजयासह पुणेरी पलटणने गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. आजच्या सामन्यात सात रेड पॉइंट घेणाऱ्या अर्जुन देशवालचे सात सामन्यात ७२ रेड पॉइंट आहेत. तो संयुक्त तिसरा सर्वाधिक रेड टाकणारा खेळाडू बनला आहे. पुणेरी पलटणच्या अस्लम इनामदारने सात सामन्यांत ६८ रेड पॉइंट घेत सर्वोतम पाच खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनी कुठल्या दुखापतीसह खेळतोय? मुंबईविरूद्ध सामन्यानंतर सीएसकेच्या एरिक सिमन्स यांचे मोठे वक्तव्य
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
Rohit Sharma takes over, sends Hardik Pandya to the boundary in iconic role-reversal as MI captain feels SRH's wrath
VIDEO : हैदराबादच्या ‘रन’ धुमाळीसमोर हार्दिकने पत्करली शरणागती, रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना पाठवले सीमारेषेवर
IPL 2024 Chennai Super Kings vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs GT: फ्लाईंग माही… गुजरातविरूद्ध सामन्यात टिपला आश्चर्यचकित करणारा झेल, ४२ वर्षीय धोनीच्या कॅचच्या VIDEO पाहाच

या सामन्याची सुरुवात अतिशय संथ झाला. पहिल्या १० मिनिटांत दोन्ही संघांनी संयमी खेळ दखवला. मात्र, त्यानंतर दोन्ही संघानी पॉईंट मिळवण्यासाठी धडपड सुरू केली. १९व्या मिनिटापर्यंत दोन्ही संघांमध्ये फारसा फरक नव्हता.  मात्र अखेरच्या मिनिटाला पुणेरी पलटणच्या संघाने १६-११ अशी आघाडी घेतली. जयपूरच्या संघाचा डिफेंस निराशाजनक होता. साहुल कुनमारचे पाच टॅकल अयशस्वी ठरले. संघाचा स्टार रेडर अर्जून देशवालही फ्लॉप ठरला.त्याला केवळ दोन पॉईंट मिळवता आले. राहुल चौधरीनं चार गुण घेत एकाकी झुंज दिली. पुणेरी पलटनकडून अस्लम इनामदारनं दमदार कामगिरी केली. त्यानं पहिल्या हाफमध्ये संघासाठी सहा पॉईंट प्राप्त केले. मोहित गोयतच्या खात्यातही चार गुण जमा झाले.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या फॉर्मवर सुनील गावसकरांनी व्यक्त केली चिंता

दुसऱ्या हाफमध्ये जयपूरच्या संघानं पुनरागमन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण पुणेरी पलटनच्या डिफेंडर्सनं त्यांना संधी दिली नाही. अस्लमनं रेडमध्ये आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली आणि सुपर १० पूर्ण केला. दुसऱ्या हाफमध्ये अर्जुननं पुनरागमन करत पहिल्या हाफपेक्षा चांगला खेळ दाखवला. जयपूरच्या डिफेंडर्सनं वारंवार चुका केल्या आणि त्याचा फायदा पुणेरी पलटनला मिळाला.