Pro Kabaddi Season 6 : पिछाडी भरुन काढत पुणेरी पलटणची हरयाणा स्टिलर्सवर मात

संदीप नरवालचा अष्टपैलू खेळ

अष्टपैलू खेळाडू संदीप नरवालने केलेल्या आक्रमक चढाईच्या जोरावर पुणेरी पलटण संघाने, प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात हरयाणा स्टिलर्सवर मात केली. अटीतटीच्या लढाईत पुण्याने हरयाणाचं आव्हान 35-33 असं मोडून काढलं.

हरयाणा स्टिलर्स संघाने आक्रमक सुरुवात करुन पुण्याला भांबावून सोडलं. मोनू गोयत आणि विकास कंडोलाच्या चढायांना आवर घालणं पहिल्या काही मिनीटांमध्ये पुण्याच्या बचावपटूंना जमलं नाही. पुण्याकडून संदीप नरवालने थोडासा प्रतिकार केला, मात्र हरयाणावर दबाव टाकणं त्याला जमलं नाही. या आक्रमक खेळाच्या जोरावर हरयाणाने पहिल्या सत्राअखेरीस 23-8 अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रात मात्र पुण्याने सामन्याचं चित्रच पालटवून टाकलं. संदीप नरवालने दुसऱ्या सत्रामध्ये सुपर रेड करत पुण्याचं आव्हान सामन्यात कायम ठेवलं. संदीपच्या आक्रमक चढाईनंतर गुरुनाथ मोरेनेही आपल्या जुन्या लौकिकाला जागत चढाईमध्ये काही महत्वाच्या गुणांची कमाई केली. संदीपने अष्टपैलू खेळ करत 7 तर गुरुनाथ मोरेने 6 गुणांची कमाई केली. या दोघांना चढाईमध्ये मोनू व अन्य बचावफळीने चांगली साथ दिली. या तुलनेत दुसऱ्या सत्रात हरयाणाचे बचावपटू आपली छाप पाडू शकले नाहीत. अखेर 35-33 च्या फरकाने पुणेरी पलटणने सामन्यात बाजी मारली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व pro kabaddi league बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pro kabaddi 2018 season 6 puneri paltan beat haryana steelers in nail biting encounter