प्रो-कबड्डीच्या इतिहासात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेल्या यू मुम्बा विरुद्ध पुणेरी पलटण सामन्यात यू मुम्बाने बाजी मारली आहे. नोएडा येथे झालेल्या सामन्यात यू मुम्बाने पुणेरी पलटणवर 31-22 ने मात करुन याआधी झालेल्या पराभवाचा बदला घेतला. यू मुम्बाच्या संघाने आज अष्टपैलू खेळ केला, मात्र पुणेरी पलटणच्या चढाईपटूंनी आजच्या सामन्यात पुरती निराशा केली, याचाच फटका त्यांना सामन्यात बसला.

नितीन तोमरच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या पुणेरी पलटण संघाने पहिल्या काही मिनीटांमध्ये आक्रमक खेळ करत आघाडी घेतली. मात्र या धक्क्यातून वेळीच सावरत यू मुम्बाच्या बचावपटूंनी सामन्यात पुनरागमन केलं. फजल अत्राचली, सुरिंदर सिंह यांनी काही सुरेख पकडी केल्या. चढाईत अभिषेक सिंह आणि दर्शन कादियान यांनी मोर्चा सांभाळात संघाच्या खात्यात महत्वाचे गुण टाकले. या जोरावर यू मुम्बाने दमदार पुनरागमन करत पहिल्या सत्राअखेरीस 19-10 अशी आघाडी घेतली. यू मुम्बाने आज आपला महत्वाचा खेळाडू सिद्धार्थ देसाईला विश्रांती दिली होती, मात्र संपूर्ण सामन्यात सिद्धार्थची अनुपस्थिती इतर खेळाडूंनी जाणवू दिली नाही.

Arjun Tendulkar Video 9 Wickets Took for Goa Cricket Association s KSCA Xi
Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकाने मैदान गाजवलं, ९ विकेट्स घेत अर्जुनने संघाला मिळवून दिला विजय, पाहा VIDEO
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
AFG vs NZ Test Day 3 play Updates in marathi
AFG vs NZ Test : ग्रेटर नोएडा स्टेडियममध्ये पावसाचा कहर, अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटीचा तिसरा दिवसही रद्द
Pathum Nissanka Hits Century and became the highest run-scorer in International Cricket 2024
ENG vs SL: पाथुम निसांका शतक झळकावताच ठरला नंबर वन फलंदाज, इंग्लंडविरूद्ध सामन्यात विक्रमांचा पाऊस
ENG vs SL WTC Points Table 2024 Sri Lanka Jumps on 4th Place
ENG vs SL: WTC Points Table मध्ये मोठी उलथापालथ, पराभवानंतर इंग्लंड टॉप-५ मधून बाहेर; श्रीलंकेने घेतली मोठी झेप
Gus Atkinson Hits First Century at No 8 and Broke Ajit Agarkar Record
Gus Atkinson Century: इंग्लंडच्या गस अ‍ॅटकिन्सने अजित आगरकरचा कित्ता गिरवला, पहिलं शतक झळकावत मोडला २२ वर्षे जुना विक्रम
Icc test rankings updates in marathi
Test Rankings : ICC ची ताजी कसोटी क्रमवारी जाहीर! यशस्वी जैस्वालला फायदा तर बाबर आझमला बसला मोठा फटका
West Indies Beat South Africa by 30 Runs in 2nd T20I Match
WI vs SA: पुन्हा जिंकता जिंकता हरली दक्षिण आफ्रिका, अखेरच्या ५ षटकांत वेस्ट इंडिजने पालटला सामना, २० धावांत ७ विकेट…

दुसरीकडे पुणेरी पलटण संघाच्या चढाईपटूंनी मात्र साफ निराशा केली. पहिल्या मिनीटांमध्ये केलेली आक्रमक सुरुवात व त्यातून मिळालेली आघाडी पुण्याला कायम राखता आली नाही. दीपक कुमार दहीया, गुरुनाथ मोरे नंतर यू मुम्बाच्या बचावफळीच्या जाळ्यात अडकत गेले. दुसऱ्या सत्रात अक्षय जाधवने 5 गुणांची कमाई करत मुम्बाला लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये त्यांना अपयश आलं. दुसऱ्या सत्रात पुण्याच्या बचावपटूंनी मात्र आश्वासक खेळ करत सुपर टॅकलमध्ये 2-2 गुणांची कमाई करत यू मुम्बाच्या आघाडीचं अंतर कमी केलं. मात्र सामन्यात बरोबरी साधण्याचं काम त्यांना करता आलं नाही. या पराभवानंतरही पुणेरी पलटणचा संघ अ गटात गुणतालिकेत 37 गुणांसह पहिल्या तर यू मुम्बाचा संघ 34 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.