Pro Kabaddi League 2021-22 GGvHS & PUNvBLR : प्रो कबड्डी लीग सिझन-८ मध्ये बेंगळुरू बुल्सने पुणेरी पलटनचा ४०-२९ असा मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह गुणतालिकेत बेंगळुरू संघ टॉपवर पोहचला आहे. दुसरीकडे गुजरात जायंट्सला हरियाणा स्टीलर्सने ३८-३६ ने पराभूत केलंय. १४ पॉईंट्सने मागे पडल्यानंतर गुजरातने झुंजार खेळी करत हा फरक केवळ २ पॉईंटवर आणून ठेवला. मात्र, ही झुंज कमी पडली आणि हरियाणाने बाजी मारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या हंगामात पुणेरी पलटणला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. दोन्ही संघांच्या मोहिमेची सुरुवात पराभवाने झाली, पण त्यानंतर बेंगळुरू बुल्सने आपल्या चुका सुधारत विजयाची हॅट्ट्रिक साधली. दुसरीकडे पुणेरी पलटणच्या पराभवाची मालिका सुरूच आहे.

पुणेरी पलटन गुणतालिकेत १२ व्या म्हणजे शेवटच्या क्रमांकावर

बुल्सचा कर्णधार पवन सेहरावत ११ पॉईंट घेऊन स्टार रेडर ठरला. मागील ६ सामन्यांपैकी बेंगळुरूचा हा चौथा विजय आहे. हा संघ सध्या २३ पॉईंट्ससह क्रमांक एकवर आहे. दुसरीकडे पुणेरी पलटनने ५ पैकी ४ सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यामुळे ५ गुणांसह पलटन १२ व्या म्हणजे शेवटच्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा : प्रो-कबड्डी लीग : कधी, कुठे आणि कसे पाहता येणार सामने? जाणून घ्या एका क्लिकवर!

आजच्या सलामीच्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने गुजरात जायंट्सवर ३८-३६ असा निसटता विजय नोंदवला. गुजरातच्या राकेशने एकूण १९ गुण घेतले. हरियाणाच्या विकास कंडोलाने ११ गुण घेत आपल्या संघाला दोन गुणांनी विजय मिळवून दिला. हरियाणाची अष्टपैलू खेळाडू मीतूनेही सुपर टेन पूर्ण केला.

मराठीतील सर्व pro kabaddi league बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi league 2021 22 ggvhs punvblr kabaddi match result latest updates pbs
First published on: 02-01-2022 at 23:11 IST