scorecardresearch

Pro Kabaddi League 2021 JPP vs HS : जयपूर पिंक पँथर्सकडून हरियाणाचा ४०-३८ असा पराभव

वीवो प्रो कबड्डी सीझन ८ मध्ये (PKL Season 8) आज (२५ डिसेंबर) चौथ्या दिवशी तिसरा सामना हा जयपूर पिंक पँथर्स (Jaipur Pink Panthers) आणि हरियाणा स्टीलर्समध्ये (Haryana Steelers) यांच्यात झाला.

Pro Kabaddi League 2021 JPP vs HS : जयपूर पिंक पँथर्सकडून हरियाणाचा ४०-३८ असा पराभव

Vivo Pro Kabaddi League JPP vs HS : वीवो प्रो कबड्डी सीझन ८ मध्ये (PKL Season 8) आज (२५ डिसेंबर) चौथ्या दिवशी तिसरा सामना हा जयपूर पिंक पँथर्स (Jaipur Pink Panthers) आणि हरियाणा स्टीलर्समध्ये (Haryana Steelers) यांच्यात झाला. या दोन्ही संघानी आतापर्यंत या हंगामात विजय मिळवलेला नव्हता. त्यामुळे दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी लढले. यात जयपूर पिंक पँथर्सला यश आलं. पँथर्सने हरियाणाचा ४०-३८ असा पराभव केला.

या सामन्यात जयपूरच्या अर्जुन देशवालने १८ पॉईंट्स मिळवले. तोच या सामन्याचा सुपर रेडर ठरला. हरियाणाचा हा सलग दुसरा पराभव आहे.

पुणेरी पलटणने मारली बाजी, तेलुगू टायटन्सचा केला पराभव

दरम्यान, प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगामाच्या आजच्या चौथ्या दिवशीचा दुसऱ्या व अतिशय अटतटीच्या सामन्यात पुणेरी पलटणने बाजी मारली आहे. पुणेरी पलटणने विरुद्ध तेलुगू टायटन्स असा हा सामना झाला. यामध्ये एका गुणाने पुणेरी पलटणने तेलुगु टायटन्सचा पराभव करत, आपला पहिला विजय नोंदवला.

पुणेरी पलटणने शेवटच्या क्षणी ३४-३३ अशी तेलुगु टायटन्सला मात दिली. टायटन्सच्या सिद्धार्थ देसाई १५ गुणांसह सुपर रेडर बनला. तर पुणेरी पलटणसाठी असलम इनामदारने ८ गुण मिळवले.

हेही वाचा : प्रो कबड्डी लीगचे फॅन आहात? तर हे १६ नियम तुम्हाला माहीत असलेच पाहिजेत!

आतापर्यंत हे दोन्ही संघ १४ वेळा आमनेसामने होते. त्यामध्ये सात वेळा पुणेरी पलटन तर सहा वेळा तेलुगु टायटन्सचा संघ विजयी झालेला होता. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये तेलुगु टायटन्सकडे आघाडी होती, मात्र नंतर पुणेरी पलटणने जोरदार कमबॅक केल्याचं दिसून आलं.

“यूपी योद्धाने पाटणा पायरेट्सवर ३६ -३५ असा विजय”

दरम्यान, आजचा पहिला सामना हा पाटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा असा झाला. या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या ठरलेल्या सामान्यात अखेर यूपी योद्धाने पाटणा पायरेट्सवर ३६ -३५ असा एका गुणाने विजय मिळवला.

Pro Kabaddi League 2021 : अटीतटीच्या सामन्यात यूपी योद्धाचा पाटणा पायरेट्सवर विजय

या सामन्यात यूपीचा प्रदीप नरवाल १२ गुण घेत सुपर रेडर ठरला. पाटणा पायरेट्सने शानदार बचाव खेळला पण अखेरच्या क्षणी संघाने एका गुणाने सामना गमावला.

मराठीतील सर्व pro kabaddi league ( Pro-kabaddi-league ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या