scorecardresearch

Pro Kabaddi Season 5 – तामिळ थलायवाजची झुंज मोडून पाटणा पायरेट्सचा विजय

अजय ठाकूरचा सामन्यात आक्रमक खेळ

पाटणा पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालला पकडण्याचा प्रयत्न करताना तामिळ थलायवाजचा संघ
पाटणा पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालला पकडण्याचा प्रयत्न करताना तामिळ थलायवाजचा संघ

प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात सर्वात तळात असलेल्या तामिळ थलायवाजची झुंज मोडून काढत गतविजेच्या पाटणा पायरेट्सने आजच्या सामन्यात निसटता विजय मिळवला आहे. ४१-३९ अशा फरकाने तामिळ थलायवाजवर मात करत घरच्या मैदानावर खेळताना पाटणा पायरेट्सच्या संघाने आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – यू मुम्बाचा धुव्वा, सलग तिसऱ्या सामन्यात गुजरात विजयी

तामिळ थलायवाजच्या संघाने आज सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत पाटण्याला धक्का दिला. सुरुवातीच्या सत्रात काही मिनीटांसाठी तामिळच्या संघाकडे आघाडीही होती. कर्णधार अजय ठाकूर, प्रपंजन, डाँग जिऑन लीने चढाईत चांगल्या गुणांची कमाई करत संघाला आघाडी मिळवून देण्यात मदत केली. अजयने सामन्यात सर्वाधीक १२ गुणांची कमाई केली. तर प्रपंजनने ८ आणि लीने ५ गुणांची कमाई करत आपल्या कर्णधाराला चांगली साथ दिली.

महत्वाची गोष्ट म्हणजे तामिळ थलायवाजच्या बचावफळीनेही चांगला खेळ करत आपल्या चढाईपटूंना मोलाची साथ दिली. उजवा कोपरारक्षक अमित हुडा, सी. अरुण, एम. थिवकरन या त्रिकुटाने पाटण्याच्या चढाईपटूंना चांगलच जेरीस आणलं होतं. मात्र मोक्याच्या क्षणी झालेल्या चुकांचा फायदा घेत पाटण्याने सामन्यात बाजी मारली.

पाटणा पायरेट्सकडून मोनू गोयतने सामन्यात १२ गुणांची कमाई केली. त्याला प्रदीप नरवालने ९ गुण मिळवत तितकीच चांगली साथ दिली. विजय या नवोदीत खेळाडूनेही ५ गुणांची कमाई करत आपलं काम चोख बजावलं. विशाल माने, सचिन शिंगाडे या जोडीनेही सामन्यात काही चांगले गुण मिळवत आपल्या संघाला परत ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या क्षणी पाटणा पायरेट्सने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना आपल्या बाजूने खेचून आणला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-09-2017 at 22:39 IST

संबंधित बातम्या