Pro Kabaddi – 7 Auction : कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, सिद्धार्थ देसाई सर्वात महागडा खेळाडू

नितीन तोमरनेही ओलांडला कोट्यवधींचा टप्पा

कोल्हापूरचा मराठमोळा कबड्डीपटू सिद्धार्थ देसाईने सातव्या हंगामात लिलावाच्या पहिल्या दिवशी आपली छाप पाडली आहे. पहिल्याच प्रयत्नात ३० लाखांच्या मूळ किमतीवरुन सिद्धार्थने १ कोटी ४५ लाखांची बोली घेत पहिल्या दिवसातला सर्वात महागडा खेळाडू ठरण्याचा मान पकटाकवला आहे. तेलगू टायटन्सने १ कोटी रुपयांची बोली लावल्यानंतर तामिळ थलायवाज आणि तेलगू टायटन्स संघात संघर्ष पहायला मिळाला. मात्र तेलगू टायटन्सने १ कोटी ४५ लाखांच्या बोलीवर सिद्धार्थला आपल्या संघात कायम राखण्यात यश मिळवलं. यू मुम्बाकडे ‘फायनल बिड टू मॅच’ कार्डाद्वारे सिद्धार्थला आपल्या संघात कायम राखण्याची संधी होती. मात्र इथेही यू मुम्बाने सिद्धार्थला आपल्या संघात कायम राखण्यात स्वारस्य न दाखवल्यामुळे सिद्धार्थ देसाईचं तेलगू टायटन्सकडून खेळणं निश्चीत झालं आहे.

पहिल्या सत्रात इराणच्या खेळाडूंनी लिलावामध्ये बाजी मारली. इराणचा बचावपटू अबुझार मेघानीने सातव्या हंगामात पहिल्यांदा लिलावाचा नारळ फोडला. अबुझारला आपल्या संघात दाखल करुन घेण्यासाठी पाटणा पायरेट्स संघ प्रयत्नशील दिसला. मात्र तेलगू टायटन्सने बिड टू मॅच कार्डाद्वारे ७५ लाखांची बोली लावत अबुझारला आपल्या संघात कायम राखलं आहे. यानंतर कोरियाचा आक्रमक चढाईपटू यंदाच्या हंगामात ४० लाखांच्या बोलीवर पाटणा पायरेट्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. हादी ओश्तनोक आणि मोहसीन या खेळाडूंना अनुक्रमे पाटणा आणि यूपी योद्धा संघाने आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं.

यानंतर इराणचा अष्टपैलू मोहम्मद इस्माईल नबीबक्षसाठी संघमालकांमध्ये चांगलीच चढाओढ झालेली पहायला मिळाली. सुरुवातीपासून यू मुम्बा, पाटणा पायरेट्स संघ नबीबक्षला आपल्या संघात दाखल करुन घेण्यासाठी उत्सुक होते. यानंतर तेलगू टायटन्स आणि बंगाल वॉरियर्स लिलावात उडी घेत रंगत वाढवली. अखेरीस ७७.७५ लाखांच्या बोलीवर बंगाल वॉरियर्सने नबीबक्षला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे.

Live Blog

19:46 (IST)08 Apr 2019
काशिलींग अडकेवर बोली नाही

कोणत्याही संघमालकाने काशिवर बोली लावायला रस दाखवलेला नाही

तुषार पाटीलवरही कोणीही बोली लावली नाही

19:37 (IST)08 Apr 2019
निलेश साळुंखे २३.५ लाखांच्या बोलीवर जयपूर पिंक पँथर्स संघाकडे

नवीन हंगामात निलेश जयपूरकडून खेळणार

19:34 (IST)08 Apr 2019
मराठमोळ्या गुरुनाछथ मोरे, गणेश राजपूतवर बोली नाही

संघमालकांचा आश्चर्यकारक कौल

19:33 (IST)08 Apr 2019
के.प्रपंजन ५५.५ लाखांची बोली

नवीन हंगामात बंगाल वॉरियर्सकडून खेळणार

19:23 (IST)08 Apr 2019
मराठमोळा ऋतुराज कोरावी पुन्हा एकदा गुजरातकडेच

कोरावीवर गुजरातची ३०.५ लाखांची बोली

19:23 (IST)08 Apr 2019
विशाल माने नवीन हंगामात पुन्हा एकदा दिल्लीकडून खेळणार

विशालवर २८.५ लाखांची बोली

19:12 (IST)08 Apr 2019
मराठमोळ्या सचिन शिंगाडेवर बोली नाही

कोणत्याही संघमालकाने सचिनवर बोली लावायला नकार दिलाय

19:08 (IST)08 Apr 2019
मोहीत छिल्लरवर ४५ लाखांची बोली

मोहीत छिल्लर नवीन हंगामात तामिळ थलायवाज संघाकडून खेळणार

18:24 (IST)08 Apr 2019
मराठमोळा श्रीकांत जाधव यंदाच्या हंगामात यूपी योद्धा संघाकडून खेळणार

श्रीकांतवर ६८ लाखांची बोली

18:23 (IST)08 Apr 2019
प्रशांत कुमार राय हरियाणा स्टिलर्स संघाकडून खेळणार

प्रशांतवर ७७ लाखांची बोली

18:18 (IST)08 Apr 2019
रिशांक देवाडीगा पुन्हा एकदा यूपी योद्धाज संघाकडे

फायनल बिड टू मॅच कार्डाद्वारे यूपी योद्धाची रिशांकवर ६१ लाखांची बोली

18:17 (IST)08 Apr 2019
राहुल चौधरीवर ९४ लाखांची बोली

नवीन हंगामात तामिळ थलायवाज संघाकडून खेळणार

18:11 (IST)08 Apr 2019
मोनू गोयत नवीन हंगामात युपी योद्धा संघाकडून खेळणार

मोनूवर ९३ लाखांची बोली

18:07 (IST)08 Apr 2019
नितीन तोमरवरही कोट्यवधी रुपयांची बोली

पुणेरी पलटणने १ कोटी २० लाखांच्या बोलीवर नितीनला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे

18:02 (IST)08 Apr 2019
मराठमोळा सिद्धार्थ देसाई पहिल्याच प्रयत्नात कोट्यधीश

तेलगू टायटन्स संघाकडून सिद्धार्थसाठी १ कोटी ४५ लाखांची बोली

17:55 (IST)08 Apr 2019
चंद्रन रणजित दबंग दिल्ली संघाकडे

रणजितवर ७० लाखांची बोली

17:46 (IST)08 Apr 2019
अमित हुडा जयपूर पिंक पँथर्स संघात

अमितवर जयपूरची ५३ लाखांची बोली

17:43 (IST)08 Apr 2019
विशाल भारद्वाज बंगाल वॉरियर्सची ६० लाखांची बोली

तेलगू टायटन्सने फायनल बिड टू मॅच कार्डाद्वारे विशालला पुन्हा आपल्या संघात घेतलंय

17:40 (IST)08 Apr 2019
परवेश भैंसवालवर तेलगू टायटन्सची ७५ लाखांची बोली

फायनल बिड टू मॅच कार्डाद्वारे परवेश पुन्हा गुजरातच्या संघात

17:38 (IST)08 Apr 2019
महेंद्रसिंहवर तेलगू टायटन्सी ८१ लाखांची बोली

मात्र फायनल बिड टू मॅच कार्डाद्वारे महेंद्र पुन्हा बंगळुरुच्या संघात

17:36 (IST)08 Apr 2019
जयदीप ३५ लाखांच्या बोलीवर गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाकडे

मात्र फायनल बिड टू मॅच कार्डाद्वारे पाटण्याने जयदीपला आपल्या संघात कायम राखलं

17:34 (IST)08 Apr 2019
सुरजित सिंह ५६ लाखांच्या बोलीवर पुणेरी पलटण संघाकडे

पुण्याच्या संघात आणखी एक भक्कम खेळाडू

17:30 (IST)08 Apr 2019
मराठमोळा डावा कोपरारक्षक गिरीश एर्नाक पुन्हा पुण्याच्या संघात

फायनल बिड टू मॅच कार्डाद्वारे गिरीशवर ३३ लाखांची बोली

17:29 (IST)08 Apr 2019
सुरिंदर नाडा नव्या हंगामात पाटणा पायरेट्स कडून खेळणार

सुरिंदर नाडावर ७७ लाखांची बोली

17:24 (IST)08 Apr 2019
रविंदर पेहल पुन्हा एकदा दबंग दिल्लीच्या संघात

फायनल बिड टू मॅच कार्डाद्वारे दिल्लीने ६१ लाखांची बोली लावत पेहलला संघात घेतलंय

17:18 (IST)08 Apr 2019
हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडू संदीप नरवाल यू मुम्बाच्या खात्यात

संदीपवर यू मुम्बाची ८९ लाखांची बोली

17:08 (IST)08 Apr 2019
बचावपटू रण सिंह तामिळ थलायवाजच्या ताफ्यात

रण सिंहवर ५५ लाखांची बोली

15:46 (IST)08 Apr 2019
लिलाव झालेल्या खेळाडूंची यादी –

अमेरिकेचा डी. जेनिंग्स १० लाखांच्या बोलीवर तेलगू टायटन्स संघाकडे

कोरियाचा डाँग क्यु किम १० लाखांच्या बोलीवर जयपूर पिंक पँथर्स संघाकडे

मोहम्मद करीम १० लाखांच्या बोलीवर यूपी योद्धा संघाकडे

15:39 (IST)08 Apr 2019
इराणचा चढाईपटू अबुफजल मग्शदुलू गुजरातच्या खात्यात

अबुझलवर गुजरातची १५.७५ लाखांची बोली

15:24 (IST)08 Apr 2019
आणखी एक कोरियन खेळाडू यू मुम्बाच्या खात्यात

मुम्बाने डाँग जिऑन ली वर २५ लाखांची बोली लावली आहे

15:12 (IST)08 Apr 2019
इराणचा मोहम्मद मग्शदुलू पाटणा पायरेट्स संघाकडे

मग्शदुलूवर पाटण्याची ३५ लाखांची बोली

15:07 (IST)08 Apr 2019
यू मुम्बाची कोरियन खेळाडूला पसंती

यंग चाँग को १० लाखांच्या बोलीवर यू मुम्बा संघाकडे

15:06 (IST)08 Apr 2019
मिलत शेइबक तामिळ थलायवाज संघाकडे

मिलतवर १० लाखांची बोली

14:58 (IST)08 Apr 2019
इराणचा हादी ताजिक पुणेरी पलटण संघाकडे

१० लाखांच्या बोलीवर हादी पुण्याच्या संघात

14:10 (IST)08 Apr 2019
संजय श्रेष्ठ बंगळुरु बुल्सकडे, तर सईद गफारी दबंग दिल्ली संघात

संजयवर बंगळुरुकडून १० तर दिल्लीची सईदवर १६.५ लाखांची बोली

13:48 (IST)08 Apr 2019
इराणच्या मोहम्मद इस्माईलसाठी संघमालकांमध्ये संघर्ष

अखेर ७७.७५ लाखांच्या बोलीवर मोहम्मद इस्माईल नबीबक्ष बंगाल वॉरियर्स संघाकडे

13:29 (IST)08 Apr 2019
हादी ओश्तनोक पाटणा पायरेट्स संघाकडे

पाटण्याकडून हादीवर १६ लाखांची बोली

मोहसीन २१ लाखांच्या बोलीवर यूपी योद्धा संघाकडे

13:25 (IST)08 Apr 2019
कोरियाचा जँग कून ली पाटणा पायरेट्स संघाकडे

पाटण्याकडून जँग कून ली वर ४० लाखांची बोली

13:21 (IST)08 Apr 2019
इराणच्या अबुझार मेघानीवर पाटण्याकडून ७५ लाखांची बोली

मात्र बिड टू मॅच कार्डाद्वारे तेलगू टायटन्सने अबुझारला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pro kabaddi season 7 auction live updates

ताज्या बातम्या