प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली आहे. १४ जुलैरोजी विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी संपल्यानंतर २० जुलैला कबड्डीचा थरार रंगणार आहे. आतापर्यंत झालेल्या सहाही हंगामांमधील सामन्यांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. सातव्या हंगामात सर्व संघ नवीन खेळाडू आणि प्रशिक्षकांसह मैदानात उतरतील. या हंगामाच्या वेळापत्रकाची नुकतीच घोषणा करण्यात आली. सलामीच्या सामन्यात यू मुम्बासमोर तेलगू टायटन्सचं आव्हान असणार आहे.
सातव्या हंगामाचे पहिल्या आठवड्याचे सामने हे हैदराबादमध्ये खेळवले जाणार असून दुसऱ्या सत्रात हे सामने मुंबईत खेळवले जातील. सहाव्या हंगामात यू मुम्बाकडून नावारुपास आलेला सिद्धार्थ चौधरी यंदा तेलगू टायटन्सकडून खेळणार आहे. त्यामुळे सलामीच्या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
जाणून घेऊयात प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाचं वेळापत्रक –