scorecardresearch

प्रो लीग हॉकी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातत्य राखण्याचे भारतीय हॉकी संघापुढे आव्हान

Pro League Hockeyजागतिक हॉकी स्पर्धेतील अपयशानंतर भारताने जगज्जेत्या जर्मनीलाच पराभूत करून प्रो लीग हॉकीच्या नव्या हंगामास शुक्रवारी सनसनाटी सुरुवात केली.

indian hockey team performance in hockey world
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

Pro League Hockeyराऊरकेला : जागतिक हॉकी स्पर्धेतील अपयशानंतर भारताने जगज्जेत्या जर्मनीलाच पराभूत करून प्रो लीग हॉकीच्या नव्या हंगामास शुक्रवारी सनसनाटी सुरुवात केली. आता दुसऱ्या सामन्यात रविवारी त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार असून, भारतीय संघासमोर सातत्य राखण्याचे आव्हान असेल.

जागतिक हॉकी स्पर्धेत भारताला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. हे अपयश पचवून भारतीय पुरुष खेळाडू हंगामी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रो लीगमध्ये उतरले तेव्हा भारताकडून किमान कामगिरीची अपेक्षा बाळगली गेली. मात्र, पहिल्याच सामन्यात भारतीय खेळाडूंनी जगज्जेत्या जर्मनीला ३-२ असे पराभूत केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-03-2023 at 00:15 IST