‘प्रो-कुस्ती लीग’ युवांसाठी सुवर्णसंधी

प्रो-कुस्ती लीगमुळे खेळाला चालना मिळेलच, पण युवांसाठी ही एक चांगली संधी असेल. युवा कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त सामने खेळण्याची संधी मिळत नाही. या लीगमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळेल. त्याचबरोबर या लीगमुळे कुस्तीला चांगली प्रसिद्धी मिळेल, घराघरांमध्ये हा खेळ पोहोचेल आणि या खेळाकडे अधिकाधिक युवा वळतील. कुस्तीमध्ये बरीच पदके जिंकून खेळाडूंनी एका उंचीवर नेऊन ठेवलेच आहे, पण या लीगमुळे हा खेळ अधिक व्यापक होईल. क्रीडा संस्कृतीची उत्तम देवाण-घेवाण होईल, असे मत ऑलिम्पिक कुस्तीपटू योगेश्वर दत्तने सांगितले.

या लीगमध्ये तीन मिनिटांचे सामने होणार आहेत, याबद्दल योगेश्वर म्हणाला की, ‘‘तीन मिनिटांच्या सामन्यामुळे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेसाठी चांगली तयारी होऊ शकेल. तीन मिनिटांच्या सामन्यांमुळे खेळ थोडासा जलद होईल आणि त्यासाठी कसून तयारी करावी लागेल. यामुळे खेळ अधिकाधिक रंजक होऊ शकेल आणि अधिक लोकाभिमुख होऊ शकेल. खासकरून युवा कुस्तीपटूंना याचा चांगला फायदा होईल.’’
या लीगमध्ये महिला आणि परदेशी कुस्तीपटूंना संधी देण्यात आली आहे, याबद्दल योगेश्वर म्हणाला की, ‘‘ भारतीय महिला कुस्तीपटूंसाठी ही अनोखी संधी असेल. कारण यापूर्वी महिला कुस्तीला जास्त प्रसिद्धी, ग्लॅमर मिळालं नव्हतं, ते या स्पर्धेमुळे मिळेल. त्यामुळे महिला कुस्तीला नक्कीच चांगले दिवस येतील. परदेशी खेळाडू या लीगमध्ये खेळणार असल्याचा कुस्तीविश्वाला आणि या खेळाला चांगलाच फायदा होईल. आम्हालाही परदेशी खेळाडूंकडून शिकता येईल.
पदक जिंकल्यावर सरकारकडून आम्हाला बक्षिसे मिळत असतात, पण युवा कुस्तीपटूंना या लीगमुळे चांगलाच आर्थिक फायदा होईल. त्यांच्या खेळाबरोबर आहाराकडेही लक्ष देता येईल. या पैशांमुळे चांगला आहार, चांगले प्रशिक्षण त्यांना घेता येईल. या कुस्तीला असा फायदा होईल की युवा खेळाडू यामध्ये कारकीर्द घडवण्याचा विचार करू शकतील आणि खेळाकडे मोठय़ा प्रमाणात वळतील. सुरुवातीला खेडय़ातून खेळाडू यायचे, नंतर शहरांमधूनही यायला लागले. या लीगमुळे कुस्ती घराघरांमध्ये पोहोचल्यावर युवांना याकडे वळण्याचे एक चांगले निमित्त मिळू शकते, असे योगेश्वर म्हणाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pro wrestling league opportunity for youngster

ताज्या बातम्या