पीटीआय, नवी दिल्ली

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत असलेल्या महिला कुस्तीगिरांची नव्या संसद भवनासमोर पंचायत घेण्यात येणार आहे. नव्या संसद भवनाचे २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, खाप महापंचायतने आंदोलनासाठी हाच दिवस आणि हेच केंद्र निश्चित केले आहे.

Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Mayawati Chandrashekhar Aazad
मायावतींची नवी खेळी; चंद्रशेखर आझाद यांना टक्कर देण्यासाठी पुतण्या रिंगणात
Nitin Gadkaris development speed is limited in his second term as MP compared to the first five years
पहिल्या पाच वर्षाच्या तुलनेत दुसऱ्यांदा खासदारकी भूषविताना गडकरींच्या विकास गतीला मर्यादा
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल

खाप महापंचायतीचाच आधार घेत कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण यांना अटक करण्यासाठी २१ मेपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीनंतर खाप महापंचायतीचे पदाधिकारी जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असेल, असे स्पष्ट केले होते. रविवारी सायंकाळी खाप पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची रोहतक येथे बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलन नव्या संसद भवनासमोर नेण्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीला कुस्तीगीर साक्षी मलिक, तिचा पती सत्यव्रत कडियान उपस्थित होते. बजरंग पुनिया व विनेश फोगट जंतरमंतर येथेच थांबले होते.बजरंगने खाप पंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले. आता महिला कुस्तीगिरांना पुरुष कुस्तीगिरांचा पािठबा राहणार की नाही, याचा निर्णय पुढे घेण्यात येईल, असे पुनिया म्हणाला.

दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक समितीने नियुक्ती केलेली हंगामी समिती २० जून रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चाचणी घेणार आहे. आता यासाठी कुस्तीगिरांकडे सरावासाठी पुरेसा वेळ नाही. त्यामुळे आंदोलनातील सहभागी कुस्तीगिरांची भूमिका काय राहणार हा प्रश्न नव्याने उपस्थित राहिला आहे.

बजरंगने याबाबतीत स्पष्ट

भूमिका घेतली असून, न्यायासाठी ऑलिम्पिक पदकाचा त्याग करावा लागला तरी चालेल असे तो म्हणाला.ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. ब्रिजभूषण यांची दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. सचिव विनोद तोमर यांचीही चौकशी झाली आहे. महासंघाला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. तक्रार दाखल केलेल्या अल्पवयीन कुस्तीगिरासह बहुतेक महिलांचे जबाबही न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवून घेण्यात आले आहेत.

नार्को चाचणीची तयारी; पण एका अटीवर -ब्रिजभूषण

आंदोलक कुस्तीगिरांच्या मागणीनुसार आपली नार्को चाचणी करण्याची तयारी असल्याचे ब्रिजभूषण रविवारी म्हणाले. मात्र, त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली. ‘‘मी नार्को चाचणी किंवा पॉलिग्राफ चाचणीसाठी तयार आहे. मात्र, माझी एक अट आहे. माझ्यासोबत विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांचीही चाचणी झाली पाहिजे. त्यांची तयारी असल्यास पत्रकार परिषद घेऊन त्यांनी तशी घोषणा करावी. त्यानंतर मी चाचणीसाठी तयार असेन हे माझे वचन आहे,’’ असे ब्रिजभूषण यांनी ‘फेसबुक’ पोस्टमध्ये म्हटले आहे.