Foreign Players Refuse To Play PSL: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सध्या तणवाचं वातावरण आहे. दोन्ही देशात क्रिकेट लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. भारतात आयपीएल २०२५ स्पर्धा तर पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरू आहे. दोन्ही देशात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम क्रिकेटवरही झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या सामन्यादरम्यान बीसीसीआयने अचानक सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. सुरक्षेचा हवाला देत ही स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. आता १७ मेपासून ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मात्र, पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरू होण्याची शक्यता खूप कमी आहे.
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर परदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत. आता या स्पर्धेतील उर्वरीत सामने खेळवण्याचा पीसीबीचा प्लॅन आहे. मात्र, परदेशी खेळाडूंनी पाकिस्तानात येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानान मिनी रिप्लेसमेंट ड्राफ्टचे आयोजन केले जाऊ शकते.
मायदेशी परतलेले खेळाडू पुन्हा एकदा पाकिस्तानात येणार का? हाच मोठा प्रश्न आहे. जगातील स्टार खेळाडूंनी या स्पर्धेतील उर्वरीत सामने खेळण्यासाठी पाकिस्तानात यावं, अशी पीसीबीची इच्छा आहे. या लीग स्पर्धेतील मुलतानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला असून या संघाचा एक सामना शिल्लक आहे. एक सामना खेळण्यासाठी पाकिस्तानात येण्यासाठी खेळाडूंनी नकार दिल्याचे म्हटले जात आहे. यासह परदेशी खेळाडूंना पाकिस्तानात परत बोलवण्याचा खर्चही पीसीबीला जड जाऊ शकतो. तर दुसरीकडे क्वेटा, इस्लामाबाद, लाहोर, कराची या संघांना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असणार आहे. त्यामुळे या संघाचे संघमालक खेळाडूंच्या सपंर्कात आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत सांगितले की, तो कराची किंग्ज संघाचे उर्वरीत सामने खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार आहे. पाकिस्तानातील माध्यमातील वृत्तानुसार, सुरक्षा देऊनही न्यूझीलंड संघातील ८ खेळाडूंनी या स्पर्धेतील उर्वरीत सामने खेळण्यासाठी पाकिस्तानात येण्यास नकार दिली आहे. ज्यात केन विल्यमसनचा देखील समावेश आहे.
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेलाही १७ मे पासून सुरूवात होणार आहे. तर स्पर्धेतील फायनलचा सामना २५ मे रोजी खेळवला जाणार आहे. साखळी फेरीतील सामने रावळपिंडीच्या मैदानावर खेळवले जातील. तर प्लेऑफ आणि अंतिम सामना लाहोरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.