scorecardresearch

पी. टी. उषा ‘आयओए’ची पहिली महिला अध्यक्ष

निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी २५ ते २७ नोव्हेंबर अशी तीन दिवसांची मुदत होती

पी. टी. उषा ‘आयओए’ची पहिली महिला अध्यक्ष
photo :pt usha twitter

नवी दिल्ली : भारताची माजी अव्वल धावपटू ‘पायोली एक्सप्रेस’ पी. टी. उषा  भारतीय ऑलिम्पिक संघटनेची (आयओए)पहिली महिला अध्यक्ष होणार आहे. ‘आयओए’च्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या रविवारच्या अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी केवळ पी.टी. उषाचा अर्जच दाखल झाला आहे.

‘आयओए’ची निवडणूक १० डिसेंबरला होणार आहे. अर्ज भरण्याची अखेरची मुदत संपल्यानंतर अध्यक्षपदासाठी केवळ उषाचाच अर्ज आल्यामुळे तिची बिनविरोध निवड निश्चित असून, त्यावर केवळ शिक्कामोर्तब बाकी आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी २५ ते २७ नोव्हेंबर अशी तीन दिवसांची मुदत होती. मात्र, पहिल्या दोन्ही दिवशी कुणीच अर्ज केला नाही. अखेरच्या दिवशी विविध पदासाठी २४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.   

अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष (१ जागा), दोन उपाध्यक्ष (एक पुरुष, एक महिला), कोषाध्यक्ष (१ जागा), सह सचिव (एक पुरुष, एक महिला), कार्यकारी परिषद (६ जागा, यातील दोन जागा सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंसाठी राखवी, एक पुरुष-एक महिला), कार्यकारी परिषदेमध्ये दोन सदस्य खेळाडू समितीमधील असतील.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 02:48 IST

संबंधित बातम्या