लंडन : इंग्लिश कौंटी क्रिकेटमधील ससेक्सकडून तिसऱ्या सामन्यात पुजाराने शुक्रवारी तिसरे शतक झळकावले.डरहॅमविरुद्धच्या सामन्यात पुजाराने १९८ चेंडूंत १६ चौकारांसह नाबाद १२८ धावा केल्या आहेत. त्याआधी, डरहॅमचा पहिला डाव २२३ धावांत आटोपला. ससेक्सकडून खेळताना पाच डावांपैकी हे पुजाराचे तिसरे शतक आहे. यात एका द्विशतकाचा (नाबाद २०१) समावेश आहे.