scorecardresearch

पुणे कबड्डी असोसिएशनची घटनादुरुस्तीसाठी ‘पददुरुस्ती’

अबाधित राखण्याच्या इराद्याने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ‘पददुरुस्ती’ची नामी शक्कल लढवली आहे.

आगामी पोटनिवडणुकीसाठी तीन प्रतिनिधी निश्चित करताना जिल्हा संघटनांनी सचिवाला स्थान देणे बंधनकारक असल्याची घटनादुरुस्ती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने केली होती. मात्र त्याला न्याय देऊन राज्य संघटनेतील आपली पदसंख्या अबाधित राखण्याच्या इराद्याने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ‘पददुरुस्ती’ची नामी शक्कल लढवली आहे.
२६ जूनला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी पुण्याकडून संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, बाबुराव चांदेरे आणि शांताराम जाधव अशी तीन नावे पाठवण्यात आली आहेत. चांदेरे आणि जाधव सध्या राज्य संघटनेवर अनुक्रमे उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्ष पद भूषवत आहेत. मात्र पुणे संघटनेचे सचिव मधुकर नलावडे यांना स्थान द्यायचे झाल्यास चांदेरे किंवा जाधव यापैकी एकाचे नाव वगळावे लागले असते. त्यामुळे पुण्याचे एक पद जाण्याची शक्यता होती. त्यावर तोडगा म्हणून आता कार्याध्यक्ष पदावरील चांदेरे पुणे जिल्ह्याचे सचिव झाले आहेत, तर नलावडे यांनी त्यांचे पद स्वीकारले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.