आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नईडून खेळतांना पुणेकर ऋतुराज गायकवाडने सर्वांची मनं जिंकली. दरम्यान, ऋतुराजचे पुण्यात आगमन झाले आहे. यावेळी पुणेकरांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. साधेपणा आणि परंपरेला जपणारा ऋतुराज सर्वांना भावला. आयपीएल २०२१ आणि करिअरमधील सर्वोत्तम खेळी करून तो पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या घरी परतला तेव्हा तो गाडीतून अनवाणी पायाने उतरला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परंपरेनुसार कुटुंबातील सदस्यांनी ऋतुराज ओवाळले. त्याचे पाय धुतले. यावेळी त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता. नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. 

ऋतुराज ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने २७ चेंडूत ३२धावा करत ऑरेंज कॅप मिळवली आहे. आयपीएलमध्ये खेळल्या गेल्या १६ सामन्यात त्याने ६३५ धावा केल्या आहेत. या खेळीत १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने एकूण ६४ चौकार आणि २३ षटकार ठोकले आहेत. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवणारा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punekar who cherishes simplicity and tradition watch rituraj gaikwads welcome in pune video srk
First published on: 17-10-2021 at 16:16 IST