पंजाब किंग्जची सह-मालकीण बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा उद्या आणि परवा होणाऱ्या (१२ आणि १३ फेब्रुवारी) आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनमधून बाहेर पडली आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ती मुलाला सोडून भारतात येऊ शकत नाही. प्रीती झिंटाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. हा लिलान बंगळुरू येथे होणार आहे. यावेळी ८ ऐवजी १० संघ लिलावात सहभागी होणार आहेत.

४७ वर्षीय प्रीती झिंटाने लिलावाच्या एक दिवस आधी शुक्रवारी तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर स्वतःचा एक फोटो अपलोड केला आणि ट्विट केले, ”मी यावेळी आयपीएल लिलाव २०२२ मध्ये भाग घेऊ शकणार नाही. मी माझ्या लहान मुलाला सोडून भारतात येऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून मी आणि माझी टीम लिलाव आणि क्रिकेटच्या सर्व गोष्टींवर एकत्र चर्चा करण्यात व्यस्त होतो.”

IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: SRH चे फलंदाज ठरले फेल पण २० वर्षाच्या तरुणतुर्क शिलेदाराने सावरला संघाचा डाव, कोण आहे हा नितीश रेड्डी?
nagpur md drug selling fight broke out between two gangs
नागपूर: पोटात गोळी शिरल्यावरही युवकाने पिस्तुल हिसकावली
Mathisha Pathirana taking an amazing catch of David Warner
CSK vs DC : मथीशा पाथिरानाने वॉर्नरचा घेतला एका हाताने अप्रतिम झेल, धोनीसह संपूर्ण स्टेडियम झाले चकीत, पाहा VIDEO
KKR beat RCB in IPL 2024
RCB vs KKR : कोलकाताचा बंगळुरूमध्ये विजयी विक्रम कायम, केकेआरकडून आरसीबीचा ७ गडी राखून पराभव

हेही वाचा – ….म्हणून केन विल्यमसनला करवतीनं कापावा वाटतोय आपला डावा हात!

यापूर्वी पंजाब संघाचा फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफरने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एका मजेदार मीमच्या माध्यमातून त्याने ट्विटरवर ही माहिती शेअर केली आहे. वसीम २०१९ मध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात सामील झाला होता.

आयपीएल २०२२ लिलावापूर्वी पंजाब किंग्जने मयांक अग्रवाल आणि युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना कायम ठेवले आहे. पंजाबने मयंकला १२ कोटी रुपयांना तर अर्शदीपला ४ कोटी रुपयांना संघात कायम ठेवले आहे. पंजाब किंग्जचा संघ सर्वाधिक ७२ कोटी रुपये घेऊन आयपीएल मेगा लिलावात उतरणार आहे.