Quinton De Kock Hundred: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना रायपूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात क्विंटन डिकॉकने शानदार शतक झळकावलं आहे. पहिल्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर डिकॉक तिसऱ्या सामन्यात झळकला आहे. यासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने निवृत्ती मागे घेत मैदानावर परतल्यानंतर आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आणि एक शानदार शतक झळकावलं. जवळजवळ दोन वर्षे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला क्विंटन डी कॉक नोव्हेंबरमध्ये निवृत्तीनंतर परतला आणि पाकिस्तानविरुद्ध सलग तीन सामन्यांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकं झळकावली. पण भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये तो फक्त ८ धावा करू शकला. पण निर्णायक सामन्यात डी कॉकने केवळ ८० चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं.
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच षटकात एक विकेट गमावली, परंतु क्विंटन डी कॉकने आपली स्फोटक फलंदाजी कायम ठेवली. यासह डी कॉकने ८० चेंडूत ८ चौकार व ६ षटकारांसह आपलं शतक पूर्ण केलं. यासह त्याच्या शतकानंतर विराट कोहली टाळ्या वाजवत त्याचं कौतुक करताना दिसला.
क्विंटन डी कॉक हा भारताविरूद्ध वनडेमध्ये अवघ्या २३ डावांमध्ये ७ शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला. त्याच्याआधी सनथ जयसूर्या यांनीही ७ शतकं केली, पण त्यांनी ८५ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. याशिवाय डी कॉकने विकेटकिपर फलंदाज म्हणून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विक्रमांची बरोबरी केली आहे.
भारताविरूद्ध वनडेमध्ये सर्वाधिक शतकं करणारे खेळाडू
क्विंटन डी कॉक – ७ शतकं, २३ डाव
सनथ जयसूर्या – ७ शतकं, ८५ डाव
एबी डिव्हिलियर्स – ६ शतकं, ३२ डाव
रिकी पॉन्टिंग – ६ शतकं, ५९ डाव
कुमार संगकारा – ६ शतकं, ७१ डाव
विकेटकिपर फलंदाज म्हणून वनडेत सर्वाधिक शतकं
२३ – कुमार संगकारा
२३ – क्विंटन डी कॉक
१९ – शाई होप
१६ – अॅडम गिलख्रिस्ट
११ – जोस बटलर
१० – एबी डिव्हिलियर्स, एमएस धोनी
