R Ashwin 3 Favourite Test Cricketers: भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू आर अश्विनने भारतीय संघाच्या ३ आवडत्या कसोटी फलंदाजांची नावं सांगितली आहेत. पण या ३ खेळाडूंमध्ये त्याने भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांची निवड केलेली नाही. सुनील गावसकर हे भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज फलंदाजांपैकी एक आहेत. त्यांच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा करण्याची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठणारे ते पहिले फलंदाज खेळाडू होते. तरीदेखील अश्विनने त्यांचा उल्लेख ३ आवडत्या कसोटी फलंदाजांमध्ये केलेला नाही. कोण आहेत अश्विनचे ३ आवडते कसोटी फलंदाज? जाणून घ्या.
क्रिकइन्फोवर आर अश्विनला ३ आवडते कसोटी फलंदाज कोणते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या अश्विनने टॉप ३ फलंदाजांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवड केली. त्यानंतर राहुल द्रविड आणि स्टार फलंदाज विराट कोहलीची निवड केली. अश्विनने सुनील गावसकरांचं नाव न घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण अश्विनने त्यांना टॉप ३ नव्हे, तर टॉप ५ मध्ये स्थान दिलं आहे. त्याने चौथ्या क्रमांकावर सुनील गावसकर आणि पाचव्या क्रमांकावर व्हीव्हीएस लक्ष्मण यांची निवड केली आहे.
या ५ खेळाडूंची निवड केल्यानंतर अश्विन म्हणाला, “मी आणखी एका खेळाडूला विसरलोय, वीरेंद्र सेहवाग. खरंच अप्रतिम फलंदाज आहे.” वीरेंद्र सेहवागने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. यादरम्यान त्याचा रेकॉर्डही दमदार राहिला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना ४९.४३ च्या सरासरीने फलंदाजी करताना ८५०३ धावा केल्या. तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा भारताचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनच्या नावे २०० कसोटी सामन्यांमध्ये १५९२१ धावा करण्याची नोंद आहे. यादरम्यान त्याने ५३.७८ च्या सरासरीने फलंदाजी करताना सर्वाधिक ५१ शतकं झळकावली. यासह सचिन तेंडुलकर हा २०० कसोटी सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे.
तर भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल द्रविड दुसऱ्या स्थानी आहे. राहुल द्रविडने १६३ कसोटी सामन्यांमध्ये ४२.५३ च्या सरासरीने फलंदाजी करताना १३२६५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या नावे ३६ शतकांची नोंद आहे. तर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये १२३ कसोटी सामन्यांमध्ये ९२३० धावा करण्याची नोंद आहे. यादरम्यान त्याने ३० शतकं झळकावली आहेत.
