R Ashwin Playin 11 Prediction For RCB vs SRH Match: आयपीएल २०२६ स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. स्पर्धेतील पहिला सामना २८ मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हे हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अतिशय खास असणार आहे. कारण बंगळुरूचा संघ पहिल्यांदाच गतविजेता म्हणून मैदानात उतरणार आहे. रजत पाटीदार पुन्हा एकदा या संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मजबूत प्लेईंग ११ निवडली आहे. पण त्याने ७ कोटी खर्च करून संघात स्थान दिलेल्या खेळाडूला संघाबाहेर ठेवलं आहे.
आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हे वेंकटेश अय्यरला ७ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं. आर अश्विनने निवडलेल्या प्लेईंग ११ मध्ये वेंकटेश अय्यरला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. वेंकटेश अय्यरला संघाबाहेर करून त्याने जेकब बेथेलला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, आर अश्विन आपल्या यूट्यूब चॅनेलवर प्रचंड सक्रिय असतो. आपल्या यूट्यूब चॅनेलवरून तो आपली मतं मांडताना दिसून येतो. आता त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची प्लेईंग ११ निवडली आहे. अश्विन म्हणाला, “विराट कोहली, फिल सॉल्ट, जेकब बेथेल, रजत पाटीदार, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, क्रृणाल पंड्या, भूवनेश्वर कुमार, मंगेश यादव, यश दयाल आणि सुयश शर्मा.”
गेल्या हंगामात वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. पण सध्या तो दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तो सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. या दुखापतीमुळे तो टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा खेळू शकला नव्हता. हेझलवूडच्या जागी कोणाला संधी मिळणार? या प्रश्नाचं उत्तर देताना अश्विन म्हणाला, “हेझलवूडच्या जागी खेळण्यासाठी यश दयाल आहे. तसेच जेकब बेथेल , जेकब डफी आणि मंगेश यादव यांच्यात देखील स्पर्धा पाहायला मिळू शकते.”
