Rachin and Daryl along with Gavaskar and Srikanth’s partnership record was broken: धरमशाला येथे भारत आणि न्यूझीलंड संघ आमनेसामने आले आहेत. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. न्यूझीलंडच्या २ विकेट्स अवघ्या १९ धावांत पडल्या होत्या, मात्र त्यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी झाली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषक सामन्यातील ही सर्वात मोठी भागीदारी आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने ५० षटकांत सर्वबाद २७३ धावा केल्या.
यापूर्वी हा विक्रम सुनील गावसकर आणि के. श्रीकांत यांच्या नावावर होता. या दोन्ही खेळाडूंनी १९८७ च्या विश्वचषक स्पर्धेत १३६ धावांची भागीदारी केली होती. आता रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल या जोडीने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याचबरोबर या दोघांमधील ही भागीदारी कोणत्याही विकेटसाठी रचलेलली न्यूझीलंडची सर्वात मोठी पाचवी भागीदारी ठरली.
रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेलने दिग्गजांना टाकले मागे –
त्याचबरोबर या यादीत राहुल द्रविड आणि मोहम्मद कैफची जोडी तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही खेळाडूंनी २००३ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध १२९ धावांची भागीदारी केली होती. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना सेंच्युरियनमध्ये खेळला गेला होता. यानंतर आता मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकरची जोडी आहे. १९९२ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकर यांच्यात १२७ धावांची भागीदारी झाली होती. हा सामना ड्युनेडिन येथे खेळला गेला.
हेही वाचा – World Cup 2023: ३१ वर्षांनंतर वनडे विश्वचषकाच्या इतिहासात नोंदवला ‘हा’ विक्रम, १० संघांनी मिळून केला पराक्रम
या यादीत आणखी कोण आहे?
यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा ही जोडी आहे. विश्वचषक २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यात ११६ धावांची भागीदारी झाली होती. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना मँचेस्टरमध्ये खेळला गेला. त्याचबरोबर या यादीत पाचव्या क्रमांकावर जॉन राइट आणि ब्रूस एडगरची जोडी आहे. १९७९ च्या विश्वचषकात जॉन राइट आणि ब्रूस एडगर यांनी भारताविरुद्ध १०० धावांची भागीदारी केली होती. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना लीड्समध्ये खेळला गेला होता.
भारत विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषक स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारी (कोणत्याही विकेटसाठी)
१५९ – रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल, धर्मशाला, २०२३
१३६ – सुनील गावस्कर आणि के. श्रीकांत, नागपूर, १९८७
१२९* – राहुल द्रविड आणि मोहम्मद कैफ, सेंच्युरियन, २००३
१२७ – मोहम्मद अझरदुद्दीन आणि सचिन तेंडुलकर, ड्युनेडिन, १९९२
११६ – एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा, मँचेस्टर, २०१९
१०० – जॉन राइट आणि ब्रूस एडगर, लीड्स, १९७९
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत सर्व गडी गमावून २७३ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी भारताला २७४ धावांची गरज आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.
न्यूझीलंडसाठी विश्वचषकातील सर्वोच्च भागीदारी (कोणत्याही विकेटसाठी)
२७३* – डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र विरुद्ध इंग्लंड, अहमदाबाद, २०२३
१६८ – ली जर्मोन, ख्रिस हॅरिस वि ऑस्ट्रेलिया, चेन्नई, १९९६
१६६* – मार्टिन गुप्टिल, ब्रेंडन मॅक्क्युलम विरुद्ध झिम्बाब्वे, अहमदाबाद, २०११
१६० – केन विल्यमसन, रॉस टेलर विरुद्ध वेस्ट इंडिज, मँचेस्टर, २०१९
१५९ – रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल विरुद्ध भारत, धरमशाला, २०२३
