Rahmanullah Gurbaz Video: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने दमदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने ११८ धावांपर्यंत मजल मारली. पण धावांचा बचाव करताना अफगाणिस्तानच्या खेळाडूंकडून बऱ्याच चूका झाल्या. यादरम्यान यष्टीरक्षक रहमानुल्लाहु गुरबाजने चेंडू अडवताना फुटबॉल किक मारुन ४ धावा दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

तर झाले असे की, भारतीय संघाकडून २१९ धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालची जोडी मैदानावर आली. त्यावेळी तिसरे षटक टाकण्यासाठी फरीद अहमद तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. यादरम्यान षटकातील तिसरा चेंडू त्याने शॉर्ट टाकला, नेहमीप्रमाणे रोहितने शॉर्ट चेंडूवर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा प्रयत्न फसला. चेंडू मिड विकेटऐवजी, बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या मागे गेला. रोहितला झेलबाद करण्याची संधी निर्माण झाली होती. पण मागच्या दिशेने धावत असलेल्या गुरबाजला चेंडूचा अंदाज आला नाही. त्यामुळे चेंडू त्याच्यापासून दूर पडला. त्याने अडवण्याचा प्रयत्न केला. पण धावताना चेंडू त्याच्या पॅडला लागून सीमारेषेपार गेला. त्याने १०० टक्के प्रयत्न केले, पण चेंडूंचा न आल्याने रोहितला ४ धावा मिळाल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रोहित – यशस्वीची भागीदारी

सुरुवातीलाच जीवदान मिळाल्यानंतर रोहितने या संधीचा चांगलाच फायदा घेतला. रोहित आणि यशस्वीने मिळून अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १७० धावांची भागीदारी केली. यादरम्यान रोहित शर्मा ७९ धावा करुन माघारी परतला. तर यशस्वी जैस्वाल शेवटपर्यंत टिकून राहिला. यशस्वीने ९४ धावांवर फलंदाजी करत असताना षटकार खेचून आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतर श्रेयस अय्यरसोबत मिळून भारतीय संघाला हा सामना ९ गडी राखून जिंकून दिला.

प्रसिध कृष्णाच्या ४ विकेट्स

या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रसिध कृष्णाच्या वादळामुळे हा निर्णय फसला. प्रसिद कृष्णाने एका पाठोपाठ अफगाणिस्तानच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. या डावात गोलंदाजी करताना त्याने ८.२ षटकात अवघ्या २३ धावा खर्च केल्या आणि ५ गडी बाद केले. यादरम्यान त्याने २ निर्धाव षटकं टाकली. त्याने वनडे कारकिर्दीत पहिल्यांदाच एकाच डावात ५ गड बाद करण्याचा कारनामा केला. दरम्यान अफगाणिस्तानचा डाव ४४.२ षटकात अवघ्या २१८ धावांव आटोपला.